APL 2025 : 6,6,6,6,6,6...युवा खेळाडूने गोलंदाजांची पिसं काढली, 246 च्या स्ट्राईक रेटने धावा, पाहा VIDEO

Last Updated:

या खेळाडूने 39 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 11 षटकार लगावले आहेत. अशाप्रकारे त्याने 246 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.

apl 2025 pyla avinash
apl 2025 pyla avinash
APL 2025, Pyla Avinash : देशभरात सध्या अनेक टी20 लीग सूरू आहेत. या लीगमध्ये अनेक युवा खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असतात. आता अशीच कामगिरी एका युवा खेळाडूने केली आहे. या खेळाडूने 39 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 11 षटकार लगावले आहेत. अशाप्रकारे त्याने 246 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.
advertisement
देशात दिल्ली प्रिमियर लीगसोबत आंध्र प्रिमियर लीग सूरू आहे.या लीगमध्ये पंजाबचा युवा खेळाडू पायला अविनाशने वादळी खेळी केली आहे. पायला अविनाश हा आंध्र प्रिमियर लीगमध्ये खेळतोय. या लीगमध्ये रॉयल्स ऑफ रायलसीमाकडून खेळताना त्याने वादळी खेळी केली आहे. पायला अविनाशने 39 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 11 षटकार लगावले आहेत. अशाप्रकारे त्याने 246 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. त्याच्यासोबत गिरीनाथ रेड्डीने 49 धावांची खेळी केली.या धावांच्या बळावर  रॉयल्स ऑफ रायलसीमाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 196 धावा काढल्या होत्या.
advertisement
आयपीएल 2025 च्या लिलावात पंजाब किंग्जने ट्रायल्समध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर निवडलेल्या अविनाशने 22चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर काही वेळातच 39 बॉलमध्ये 96 धावांची खेळी केली आहे. तथापि, एका चांगल्या शतकापासून एक हिट दूर असताना, विजयवाडा सनशाइनर्सचा गोलंदाज के एस नरसिंह राजूच्या गोलंदाजीवर तो तरुण बाद झाला.
advertisement

अविनाशची खेळी वाया

रॉयल्स ऑफ रायलसीमाने दिलेल्या 196 धावांचा विजयवाडा सनशायनरने यशस्वी पाठलाग करत 7 विकेटने सामना जिंकला. विजयवाडाकडून अश्विन हेब्बरने 48 बॉलमध्ये 98 धावांची खेळी केली.तर गरीमा तेजाने 37 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली.या खेळाच्या बळावर विजयवाडा सनशायनरने 7 विकेट राखून लक्ष्य गाठत सामना जिंकला.
advertisement
अविनाशने गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आंध्रसाठी व्यावसायिक टी20 पदार्पण केले आणि पदार्पणातच महाराष्ट्राविरुद्ध 39 बॉलमध्ये 55 धावा केल्या. 2024 आंध्र टी20 लीगमध्ये त्याने 47.25 च्या सरासरीने आणि 142.10 च्या स्ट्राईक रेटने 189 धावा केल्या. उजव्या हाताच्या या गोलंदाजाने एपीएल 2024 बेझवाडा टायगर्सकडून गोदावरी टायटन्सविरुद्ध शतक ठोकले.
advertisement
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
APL 2025 : 6,6,6,6,6,6...युवा खेळाडूने गोलंदाजांची पिसं काढली, 246 च्या स्ट्राईक रेटने धावा, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement