Arjun Tendulkar : सचिनच्या घरात वाजणार सनई-चौघडे, अर्जुन-सानियाच्या लग्नाची तारीख ठरली!

Last Updated:

सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. सचिनचा मुलगा अर्जुन आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

सचिनच्या घरात वाजणार सनई-चौघडे, अर्जुन-सानियाच्या लग्नाची तारीख ठरली!
सचिनच्या घरात वाजणार सनई-चौघडे, अर्जुन-सानियाच्या लग्नाची तारीख ठरली!
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. सचिनचा मुलगा अर्जुन आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 2025 च्या ऑगस्ट महिन्यात अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला होता. सानिया चांडोक ही मुंबईमधील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. एका खासगी समारंभामध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा पार पडला होता. आता मार्च महिन्यामध्ये या दोघांचं लग्न होईल, असं वृत्त समोर आलं आहे.

कधी होणार अर्जुन-सानियाचं लग्न?

लग्नाचे विधी 3 मार्च रोजी सुरू होणार आहेत, तर मुख्य समारंभ 5 मार्च 2026 रोजी होण्याची अपेक्षा आहे. जगाचे लक्ष या कार्यक्रमावर केंद्रित असले तरी, हा समारंभ खाजगी राहील. द टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, हा समारंभ मुंबईत होणार आहे आणि हा एक खाजगी कार्यक्रम असेल ज्यामध्ये फक्त कुटुंब, जवळचे मित्र आणि क्रिकेट जगतातील काही निवडक सदस्य उपस्थित राहतील.
advertisement
अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू असतानाच सचिनने स्वतः याची पुष्टी केली होती. रेडिट एएमए (आस्क मी एनीथिंग) सत्रादरम्यान सचिनने अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. अर्जुनचा साखरपुडा झाला आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने सचिनला विचारला होता. तेव्हा सचिनने 'हो त्याचा साखरपुडा झाला आहे, त्याच्या आयुष्यातील नव्या टप्प्याबद्दल आम्ही सगळे उत्सुक आहोत,' असं सचिन म्हणाला होता.
advertisement

अर्जुन आयपीएलच्या नव्या टीममध्ये

अर्जुनने स्थानिक क्रिकेटमध्ये स्वतःचं एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्जुनने मुंबईकडून त्याच्या देशांतर्गत क्रिकेटला सुरूवात केली, पण नव्या संधीच्या शोधात अर्जुन गोव्याकडे गेला. अर्जुनने 2022 च्या रणजी ट्रॉफीसाठी गोव्याकडून पदार्पण केलं. आयपीएलमध्येही मागचे बरेच मोसम अर्जुन मुंबई इंडियन्सकडे होता, पण यंदाच्या मोसमात तो लखनऊ सुपरजायंट्ससाठी खेळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : सचिनच्या घरात वाजणार सनई-चौघडे, अर्जुन-सानियाच्या लग्नाची तारीख ठरली!
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement