IPL 2026 : 'सगळे सोडा पण याला पंजाबमध्ये घ्या...', ऑस्ट्रेलियात शतक ठोकणाऱ्या खेळाडूवर अर्शदीप फिदा, प्रिंती झिंटाला खास रिक्वेस्ट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arshdeep Singh requested PBKS : निखिल चौधरी या शतकात शेफील्ड शिल्डमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला आहे.
Arshdeep Singh On Nikhil Chaudhary : आगामी आयपीएल हंगामासाठी आता पुढील महिन्यात लिलाव पार पडणार आहे. यंदाचा लिलाव जरी मिनी लिलाव असला तरी रिलीज केलेल्या खेळाडूंमुळे लिलावाची उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशातच आता पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलला सोडल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या होत्या. अशातच आता अर्शदीपने असा खेळाडू शोधून काढलाय, ज्याला सर्वच संघ बोली लावण्याची शक्यता आहे. अर्शदीपने खास स्टोरी ठेवत एका ऑस्ट्रेलियन खेळाडूचं कौतूक केलं.
निखीलचा शेफील्ड शिल्डमध्ये धुमाकूळ
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून निखील चौधरी आहे. तुम्ही याला ओळखत नसाल आणि त्याचं नाव देखील ऐकलं नसेल. निखील शेफील्ड शिल्डमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालत आहे. दिल्लीत जन्मलेला आणि पंजाबसाठी लिस्ट ए क्रिकेट खेळणारा निखिल चौधरी या शतकात शेफील्ड शिल्डमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला आहे.
advertisement
2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला पण...
दिल्लीत जन्मलेला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा निखिल चौधरी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला आणि कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान तो तिथंच अडकला. तेव्हापासून, तो भारतीय नागरिक असूनही ऑस्ट्रेलियन कायमचा रहिवासी झाला आहे. निखीलने 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 163 धावांची आक्रमक खेळी केली. स्पिन बॉलिंगपासून सुरूवात केलेल्या निखीलचं आता अर्शदीपने कौतूक केलं आहे.
advertisement
अर्शदीपची पंजाब किंग्जकडे मागणी
दरम्यान, अर्शदीप सिंगने इन्टाग्रामवर टाकलेल्या एका स्टोरीमध्ये पंजाब किंग्जकडे एक मागणी केली आहे. अर्शदीपने निखिलाच्या इनिंगचा एक फोटो शेअर करत त्याला पंजाब किंग्जमध्ये घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज आगामी लिलावात निखील चौधरीला संघात सामील करून घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 7:58 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'सगळे सोडा पण याला पंजाबमध्ये घ्या...', ऑस्ट्रेलियात शतक ठोकणाऱ्या खेळाडूवर अर्शदीप फिदा, प्रिंती झिंटाला खास रिक्वेस्ट!


