Ashes : गंभीरचा फॉर्म्युला वापरून तोंडावर आपटली ऑस्ट्रेलिया, 137 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऍशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनी येथे खेळली जात आहे.
सिडनी : ऍशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनी येथे खेळली जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने असा निर्णय घेतला ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले, विशेषतः मेलबर्नमधील मागील टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानंतर हा निर्णय धक्कादायक होता, कारण ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने घेतलेला निर्णय 137 वर्षांमध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच घेण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने घेतलेला हा निर्णय टीमच्या प्लेइंग इलेव्हन संदर्भात होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात एकही स्पेशलिस्ट स्पिनरशिवाय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा स्पेशलिस्ट स्पिनरशिवाय मैदानात उतरली. सिडनीची खेळपट्टी ही स्पिन बॉलरना मदत करणारी समजली जाते, त्यामुळे 137 वर्षांत सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया स्पिनरशिवाय खेळल्याची ही पहिलीच वेळ होती.
advertisement
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये टॉड मर्फीच्या जागी ब्यु वेस्टरला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीममध्ये एकही स्पिनरचा समावेश झाला नाही. 1888 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने स्पेशलिस्ट स्पिनरशिवाय सिडनी टेस्ट खेळली.
गंभीरचा फॉर्म्युला
ऑस्ट्रेलियाने या सामन्यामध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा ऑलराऊंडर खेळवण्याचा फॉर्म्युला वापरला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमरून ग्रीन, ब्यु वेबस्टर आणि मायकल नेसर या तीन ऑलराऊंडरना संधी दिली, पण ग्रीन आणि वेबस्टरला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही, तर नेसरने एक विकेट घेतली, त्यामुळे ऑलराऊंडर खेळवण्याचा हा फॉर्म्युला ऑस्ट्रेलियाच्या फायद्याचा ठरला नाही.
advertisement
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरॉल्ड, मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 11:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ashes : गंभीरचा फॉर्म्युला वापरून तोंडावर आपटली ऑस्ट्रेलिया, 137 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!










