Asia Cup 2025 : हायव्होल्टेज राडा झाला तरी IND vs PAK फायनलमध्ये भिडणार? असे आहे सूपर 4चं गणित

Last Updated:

पाकिस्तानकडे पुनरागमन करण्यासाठी दोन संधी चालून आल्या आहेत. या संधीचं जर पाकिस्तानने सोनं केलं तर फायनलमध्ये भारत पाकिस्तानशी पुन्हा भिडताना दिसणार आहे.

India Pakistan Super 4 Equation
India Pakistan Super 4 Equation
India Pakistan Super 4 Equation : आशिया कपच्या सुपर 4च्या दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेट राखून पाकिस्तानाला धूळ चारली होती. या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाईल असे बोलले जात होते. पण पाकिस्तानकडे पुनरागमन करण्यासाठी दोन संधी चालून आल्या आहेत. या संधीचं जर पाकिस्तानने सोनं केलं तर फायनलमध्ये भारत पाकिस्तानशी पुन्हा भिडताना दिसणार आहे. यासाठी सुपर 4 चं समीकरण कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पाकिस्तान पॉईंट्स टेबलच्या तळाशी गेला आहे.पाकिस्तानचे सध्या 1 सामन्यात शून्य गुण आहेत आणि पाकिस्तानचा रनरेट -0.689 आहे. आता पाकिस्तानला सुपर 4 मध्ये आणखी दोन सामने खेळायचे आहे.
पाकिस्तानला सुपर 4 मध्ये दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध खेळायचा आहे. आणि तिसरा सामना हा 25 सप्टेंबरला बांग्लादेश विरूद्ध खेळावा लागणार आहे.आता जर पाकिस्तानने या दोन्ही संघाचा पराभव केला तर पाकिस्तानचे सुपर 4 च्या पॉईटस टेबलमध्ये 4 गुण होणार आहे.अशाप्रकारे पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचण्यास पात्र ठरणार आहे.
advertisement
आता ही झाली पाकिस्तानची गोष्ट.भारताबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानला हरवल्यानंतर पॉईटस टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. या दरम्यान भारताच्या खात्यात 1 सामन्यात 2 गुण आहेत. आता अजून भारताला दोन सामने खेळायचे आहेत.
टीम इंडियाला सुपर 4 मध्ये दुसरा सामना हा बांग्लादेश विरूद्ध 24 सप्टेंबरला खेळायचा आहे. आणि तिसरा सामना हा 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध असणार आहे. या दोन पैकी भारताने एक जरी सामना जिंकला तर गुण 4 होणार आहेत.
advertisement
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने जर दोन दोन सामने जिंकले तर हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमने सामने येण्याची शक्यता आहे.त्यामुळे दोन्ही संघांमध्ये पुन्हा हायव्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत. आता हे दोन्ही संघ त्यांचे उर्वरीत सामने जिंकतात,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाकिस्तानी खेळाडूंचं वादग्रस्त सेलिब्रेशन
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या या पराभवानंतर आता हॅरीस रौफच्या बायकोने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तीने या हायव्होल्टेज सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सामना हरलो असू, पण लढाई आम्ही जिंकली आहे,अशी वादग्रस्त पोस्ट तिने केली आहे. हॅरीसची बायको या पोस्टमधून सांगते की मॅच हरलो पण युद्धातली लढाई जिंकलो,असाच होतोय. त्यामुळे या पोस्टनंतर आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर भारताविरूद्धच्या सामन्यात हॅरीस रौफ बेफाम सुटला होता.पहिल्यांदा त्याचा टीम इंडियाचा सलामीवर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसोबत मैदानात राडा झाला.या राड्यानंतर त्याने मैदानात एअर फायटर प्लेनचा स्फोट होतो, अशी वादग्रस्त अॅक्शन केली होती.या सोबत मैदानात 6-0 अशी अॅक्शन करतानाही दिसला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : हायव्होल्टेज राडा झाला तरी IND vs PAK फायनलमध्ये भिडणार? असे आहे सूपर 4चं गणित
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement