Asian Games : एशियन गेम्समध्ये टीम इंडियाला सुवर्ण, सामना न खेळताच चॅम्पियन कसे?

Last Updated:

एशियन गेम्समध्ये अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात आले.

News18
News18
हाँगझोऊ, 07 ऑक्टोबर : चीनच्या हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या एशियन गेम्सममध्ये भारतीय क्रिकेट संघाने सुवर्ण पदक पटकावलं. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना पावसाला सुरुवात झाली. यामुळे सामना रद्द करण्यात आला. यानंतर भारताला विजेता घोषित करण्यात आले.
अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करताना १८.२ षटकात ११२ धावांवर खेळत होता. तेव्हा पाऊस सुरू झाला. यानंतर पंचांना सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. बराच वेळ पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अफगाणिस्तानचा संघही फारशी चमक दाखवू शकला नव्हता. ११२ धावात त्यांचे ५ गडी बाद झाले होते. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
advertisement
भारताकडून अर्शदिप सिंह, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, शिवम दुबे यांनी विकेट घेतल्या. तर अफगाणिस्तानच्या शाहिदुल्लाह कमलच फक्त भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला. त्याने नाबाद ४९ धावा केल्या. भारतीय संघाचे रँकिंग अफगाणिस्तानपेक्षा चांगले असल्यानं सुवर्णपदक भारताला मिळाले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : एशियन गेम्समध्ये टीम इंडियाला सुवर्ण, सामना न खेळताच चॅम्पियन कसे?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement