बाप्पा पावला ! एशियन गेम्सला जाण्यापूर्वी ऋतुराजकडून श्रीगणेशाची आरती, टीम इंडियाला आता गोल्ड मेडल, Video

Last Updated:

एशियन गेम्समधील सुवर्णपदकाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे.

+
News18

News18

पुणे, 7 ऑक्टोबर : सध्या संपूर्ण देश वर्ल्ड कपमुळे क्रिकेटमय झाला आहे आणि अशातच भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एशियन गेम्समधील सुवर्णपदकाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे. 26 सप्टेंबर रोजी सामान्यांना जाण्यापूर्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर आणि एशियन गेम्ससाठीचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे बाप्पा पावला अशा प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमीं व्यक्त करत आहेत.
चीनच्या हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या एशियन गेम्सममध्ये भारतीय क्रिकेट संघाने सुवर्ण पदक पटकावलं. अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करताना 18.2 षटकात 112 धावांवर खेळत होता. तेव्हा पाऊस सुरू झाला. यानंतर पंचांना सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. बराच वेळ पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळणार का नाही? कॅप्टन रोहितने दिली मोठी अपडेट
अफगाणिस्तानचा संघही फारशी चमक दाखवू शकला नव्हता. 112 धावात त्यांचे 5 गडी बाद झाले होते. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून अर्शदिप सिंह, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, शिवम दुबे यांनी विकेट घेतल्या. तर अफगाणिस्तानच्या शाहिदुल्लाह कमलच फक्त भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकला. त्याने नाबाद 39 धावा केल्या. भारतीय संघाचे रँकिंग अफगाणिस्तानपेक्षा चांगले असल्यानं सुवर्णपदक भारताला मिळाले.
advertisement
Asian Games : शेवटच्या दोन मिनिटात वाद, अर्धा तास खेळ थांबला; अखेर भारताने जिंकलं सुवर्ण
एशियन गेम्ससाठी रवाना होण्यापूर्वी एशियन गेम्समध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन ऋतुराज याने सपत्नीक दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती घेऊन दर्शन घेतलं होतं. या टीमकडून सर्वांनाच सुवर्णपदकाची अपेक्षा होती. एशियन गेम्ससाठी जाण्यापूर्वी ऋतुराजनं गणपतीचं दर्शन घेतल्याने दगडूशेठ हलवाई बाप्पा पावला असून टीम इंडियाला एशियन गेम्समध्ये असेच यश मिळो आणि बाप्पाचा आशीर्वाद टीम इंडियावर राहो अशी प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमीं ईशान देशमुख यांनी दिली. 
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बाप्पा पावला ! एशियन गेम्सला जाण्यापूर्वी ऋतुराजकडून श्रीगणेशाची आरती, टीम इंडियाला आता गोल्ड मेडल, Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement