World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळणार का नाही? कॅप्टन रोहितने दिली मोठी अपडेट

Last Updated:

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा पहिला सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. शुभमन गिल या सामन्यात खेळणार का नाही? याबाबत अजूनही साशंकता कायम आहे.

वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल खेळणार का नाही?
वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिल खेळणार का नाही?
चेन्नई, 7 ऑक्टोबर : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा पहिला सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. शुभमन गिल या सामन्यात खेळणार का नाही? याबाबत अजूनही साशंकता कायम आहे, त्यातच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मॅचच्या एक दिवस आधी गिलच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. शुभमन गिल मॅचआधी फिट व्हावा आणि तो मैदानात उतरावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
रोहित शर्माला पत्रकार परिषदेत गिलच्या दुखापतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'गिल लवकरात लवकर बरा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्याला पूर्णपणे फिट व्हायची संधी देऊ. तो तरुण आहे, शरीर फिट असल्यामुळे तो लवकर बरा होईल,' असं रोहितने सांगितलं. पहिल्या सामन्यात गिलच्या खेळण्याची शक्यता रोहितने फेटाळलेली नाही.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तो जर खेळला नाही तर भारतीय टीमला मोठा धक्का बसेल. मेडिकल टीम शुभमन गिलवर लक्ष ठेवून आहे, त्याला आता बरं वाटत आहे. तो अजूनही पहिल्या सामन्यातून बाहेर झालेला नाही, आम्ही त्याच्याबद्दल उद्या निर्णय घेऊ, असं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितलं.
advertisement
टीमसाठी जे करता येईल ते करण्यावर माझा फोकस असेल, टीमला चांगली सुरूवात द्यायचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली. तसंच देशासाठी वर्ल्ड कप खेळणं माझ्यासाठी अभिमानाचं असल्याचंही रोहित म्हणाला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताला आशियाई स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं, याबद्दलही रोहित शर्माने टीमचं अभिनंदन केलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळणार का नाही? कॅप्टन रोहितने दिली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement