Asian Games 2023 : युवराज सिंहचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! या खेळाडूने अवघ्या 9 बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक

Last Updated:

या खेळाडूनं भारताच्या युवराजसिंगचं वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलं आहे. भारताचा माजी ऑल राउंडर खेळाडू युवराजसिंगच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम होता.

News18
News18
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : सध्या चीनमधील हांग्झू शहरात एशियन गेम्स 2023 ही क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या वेळच्या एशियन गेम्समध्ये पुरूष आणि महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. महिलांच्या मॅचेस संपल्या असून भारतीय महिला क्रिकेट टीमनं गोल्ड मेडल जिंकलं आहे. तर, पुरूषांच्या टी-20 मॅचेस कालपासून सुरू झाल्या आहेत. त्यातील पहिल्याच मॅचमध्ये नेपाळच्या एका खेळाडूनं इतिहास रचला.
या खेळाडूनं भारताच्या युवराजसिंगचं वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलं आहे. भारताचा माजी ऑल राउंडर खेळाडू युवराजसिंगच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम होता. युवराजनं 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. मात्र, एशियन गेम्समध्ये नेपाळच्या एका खेळाडूनं केवळ 9 बॉलमध्ये अर्धशतक झळकवून क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. 'झी न्यूज'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
दीपेंद्र सिंह आयरी असं या खेळाडूचं नाव आहे. त्याने युवराजसिंगचा विक्रम मोडला आहे. दीपेंद्रनं केवळ 9 बॉलमध्ये टी-20 मधील सर्वांत जलद अर्धशतक झळकवलं आहे. यादरम्यान त्यानं 10 बॉलचा सामना करून आठ सिक्सच्या मदतीनं नाबाद 52 रन केल्या. दीपेंद्रनं पहिल्या सहा बॉलमध्ये सहा सिक्स ठोकले. युवराजनं 2007मधील टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. याच मॅचमध्ये युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते.
advertisement
नेपाळच्या खेळाडूनं केलं सर्वात वेगवान शतक
नेपाळचाच आणखी एक खेळाडू कुशल मल्लानं टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकवण्याची कामगिरी केली आहे. कुशल मल्लानं भारतीय कॅप्टन रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डेव्हिड मिलर यांचा विक्रम मोडला आहे. रोहित आणि डेव्हिडनं आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 35 बॉलमध्ये शतक झळकवलेलं आहे. कुशल मल्लानं मंगोलियन टीमविरुद्ध अवघ्या 34 बॉलमध्ये शतक झळकवलं आहे. मल्लानं 50 बॉलमध्ये 8 फोर आणि 12 सिक्सच्या मदतीनं एकूण 137 रन केले.
advertisement
आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये पहिल्यांदाच झाले 300 रन
या मॅचमध्ये मंगोलियन टीमनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मंगोलियाविरुद्ध प्रथम बॅटिंग करताना नेपाळच्या टीमनं 20 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 314 रन केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचच्या इतिहासात एका इनिंगमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 300 रनचा टप्पा पार करणारी नेपाळ ही पहिलीच टीम ठरली आहे.
advertisement

view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games 2023 : युवराज सिंहचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! या खेळाडूने अवघ्या 9 बॉलमध्ये ठोकलं अर्धशतक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement