IND vs AUS : टीम इंडियाने 136 धावांवर भूईसपाट, 26 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचं आव्हान!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Australia : केएल राहुलने 38 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली. अखेरीस नितीश कुमार रेड्डीने 19 धावांची खेळी केली.
IND vs AUS 1st ODI, Perth : वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिका जिंकल्यानंतर आता तब्बल सात महिन्यानंतर टीम इंडिया वनडे सामना खेळत आहे. पर्थवर सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 136 धावा केल्या आहेत. पावसाने सतत हजेरी लावल्याने टीम इंडियाला फक्त 26 ओव्हरपर्यंत बॅटिंग करता आली. तर ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी DRS मुळे 26 ओव्हरमध्ये 131 धावा करायच्या आहेत. अशातच आता पावसाने पुन्हा खोडा घातला तर ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढणार आहे.
केएल राहुलने 38 धावांची खेळी
टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट बाद झाले. त्यानंतर कॅप्टन शुभमन गिल देखील लगेच बाद झाला. श्रेयस अय्यरने पाय रोवण्याचा प्रयत्न केला. पण पावसाने सतत अडथळा आणल्यानंतर श्रेयसची विकेट गेली. त्यानंतर केएल राहुलने कडवी झुंड दिली अन् आक्रमक फलंदाजी केली. केएल राहुलने 38 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली. अखेरीस नितीश कुमार रेड्डीने 19 धावांची खेळी केली. अखेरच्या चार ओव्हरमध्ये टीम इंडियाने 30 धावा केल्या. त्यामुळे समाधानकारक टार्गेट देता आलंय.
advertisement
तीन पेस बॉलर्स
टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये तीन पेस बॉलर्स आहेत. हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यावर टीम इंडियाची मदार असणार आहेत. तर क्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या बॉलिंगवर देखील लक्ष असेल.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
advertisement
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियाने 136 धावांवर भूईसपाट, 26 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचं आव्हान!