AUS vs IND 1st T20 : पहिल्या टी-20 मध्ये सूर्याची मोठा निर्णय! मॅचविनर बेंचवर, तीन स्पिनर्ससह मैदानात; पाहा प्लेइंग इलेव्हन

Last Updated:

Australia vs India 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-टवेंटी सिरीजमधील पहिल्या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने जिंकला आहे.

Australia vs India 1st T20
Australia vs India 1st T20
Australia vs India 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-टवेंटी सिरीजमधील पहिल्या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने जिंकला आहे. त्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात मोठे बदल झाले नसून तीन स्पिनर्ससह टीम इंडिया मैदानात उतरेल. तसेच हर्षित राणासह दोन ऑलराऊंडरसह टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.

प्रथम बॅटिंग करण्याचा विचार - सूर्या

सूर्यकुमार यादवने म्हटले की, "आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा विचार करत होतो. ही एक चांगली विकेट दिसत आहे आणि मला आमच्या ॲनालिस्ट्सकडून माहिती मिळाली आहे की, येथे जास्त मॅचेस खेळल्या गेल्या नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट थोडी स्लो होऊ शकते, म्हणून आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार होतो."
advertisement

नितीश कुमार रेड्डी बाहेर

नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी बाहेर पडले आहेत. अ‍ॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या डाव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरत असलेल्या या अष्टपैलू खेळाडूने मानेच्या दुखापतीची तक्रार केली होती, ज्यामुळे त्याच्या पुनर्प्राप्ती आणि हालचालीवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs IND 1st T20 : पहिल्या टी-20 मध्ये सूर्याची मोठा निर्णय! मॅचविनर बेंचवर, तीन स्पिनर्ससह मैदानात; पाहा प्लेइंग इलेव्हन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement