November Horoscope: सिंह, वृषभसह या 5 राशींची गाडी पुन्हा मार्गावर; नोव्हेंबरमध्ये मोठा पल्ला गाठणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
November Horoscope: लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे आणि या महिन्यात ग्रह-नक्षत्रांची चाल पाच राशींसाठी खूप शुभ मानली जात आहे. ज्योतिष जाणकारांच्या मते, नोव्हेंबरमध्ये पाच राशींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्तरावर जबरदस्त फायदा होऊ शकतो. ज्यांची कामे खूप दिवसांपासून अडकलेली होती, ती नोव्हेंबरमध्ये वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यातील भाग्यवान राशींविषयी.
वृषभ - नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात भरभक्कम वाढ होऊ शकते. पदोन्नती आणि वेतनवाढीचे योग आहेत. व्यापाऱ्यांचा फायदा वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत हा काळ आराम देणारा असेल. रोगांपासून मुक्ती मिळेल. घर-कुटुंबामध्ये आई-वडील आणि मोठ्यांचे आरोग्यही स्थिर आणि समाधानकारक राहील.
advertisement
मिथुन - करिअरमध्ये प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीमध्ये मनासारखी ट्रान्सफर मिळू शकते. व्यवसायाच्या विस्तारासाठी वेळ अनुकूल आहे. आर्थिक योजनांना गती मिळेल. जे लोक नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करू इच्छित आहेत, त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी जोडलेले निर्णय भविष्यात चांगला फायदा देतील.
advertisement
सिंह - धन-संपत्तीच्या बाबतीत सुधारणा होईल. गुप्त स्रोतांकडून पैसा मिळू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. या महिन्यात तुमचा खर्च कमी होऊ शकतो. पैशांची बचत होईल. मित्र आणि नातेवाईकांसोबतचे संबंध मजबूत होतील. करिअरमध्ये झालेले काही चांगले बदल तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. बदलांचा स्वीकार करा आणि पुढे जाण्याची योजना (रणनीती) वापरा.
advertisement
मकर - मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेले पैसेही हाती लागू शकतात. तुमचे बोलणे आणि स्वभाव लोकांवर प्रभाव टाकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुमच्या समोर शत्रू दुबळे दिसू लागतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. जीवनसाथीचा पाठिंबा तुम्हाला महत्त्वाची संधी मिळवून देऊ शकतो.
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठीसुद्धा एकूणच नोव्हेंबर महिना शुभ राहणार आहे. पैशांची आवक वाढेल. पैशाचे व्यवस्थापन उत्तम कराल. पण, खाण्यापिण्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायात जो तोटा तुम्ही खूप दिवसांपासून अनुभवत होता, त्याची भरपाई होण्याचा मार्ग मिळेल. आवडीच्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


