Asia Cup 2025 : टीम इंडियानंतर शेजारी देशाने जाहीर केला आशिया कपसाठी संघ, ऋषभ पंतच्या तोडीच्या खेळाडूची 3 वर्षानंतर एन्ट्री!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bangladesh Asia Cup 2025 Squad : पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपसाठी बांगलादेशने 16 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. सोहन तीन वर्षांनंतर राष्ट्रीय टीममध्ये परतला आहे.
Bangladesh Asia Cup Squad : आगामी आशिया कपसाठी बीसीसीआयने 15 खेळाडूंच्या स्कॉडची घोषणा नुकतीच केली आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली करेल. अशातच आता बांगलादेशने देखील आशिया कपसाठी खेळाडू जाहीर केले आहेत. बांगलादेशचा विकेटकीपर नुरुल हसन सोहनचे टीममध्ये पुनरागमन झाले आहे, तर सैफ हसनलाही संधी मिळाली आहे. आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. सोहन तीन वर्षांनंतर राष्ट्रीय टीममध्ये परतला आहे. 2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध तो शेवटचा खेळला होता.
लिटन दास कॅप्टन
सोहनने बांगलादेश 'ए' साठीच्या T20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 5 मॅचमध्ये 109 रन केले होते, ज्यात त्याचा सर्वोच्च स्कोर 35 रन होता. दुसरीकडे, 2023 च्या आशियाई गेम्समध्ये खेळलेल्या सैफनेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. सैफने 130 च्या स्ट्राइक रेटने 117 रन केले होते. लिटन दास टी20 टीममध्ये कायम राहील. त्याने अलीकडेच झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धही टीमची जबाबदारी सांभाळली होती.
advertisement
स्पिन गोलंदाजीमध्ये नासुम अहमद आणि रिशाद हुसेन
आशिया कपमध्ये तंजिद हसन तमीम आणि परवेझ हुसेन इमोन डावाची सुरुवात करतील, तर मेहदी हसनलाही वरच्या फळीत संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी तस्कीन अहमद, शौरिफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांच्या खांद्यावर असेल, तर स्पिन गोलंदाजीमध्ये नासुम अहमद आणि रिशाद हुसेन यांच्यासोबत मेहदी असेल. मधल्या फळीची जबाबदारी जॅकर अली अनिक, तौहीद हृदॉय आणि शमीम हुसेन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
advertisement
चौथ्यांदा फायनलमध्ये जाणार?
बांगलादेश आपल्या अभियानाची सुरुवात 11 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये हाँगकाँगविरुद्ध करेल. बांगलादेशने 2012, 2016 आणि 2018 मध्ये तीन वेळा आशिया कपच्या अंतिम मॅचमध्ये धडक मारली आहे, पण उपविजेता राहिला. फायनलमध्ये त्यांना एकदा पाकिस्तानकडून आणि दोन वेळा भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
advertisement
आशिया कपसाठी बांगलादेशचा स्कॉड -
लिटन दास (कॅप्टन), तंजीद हसन तमीम, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हृदोय, जाकिर अली अनिक, शमीम हुसैन, नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शौरिफुल इस्लाम आणि मोहम्मद सैफुद्दीन.
स्टँडबाय खेळाडू - सौम्य सरकार, मेहदी हसन मिराज, तनवीर इस्लाम और हसन महमूद
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:28 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : टीम इंडियानंतर शेजारी देशाने जाहीर केला आशिया कपसाठी संघ, ऋषभ पंतच्या तोडीच्या खेळाडूची 3 वर्षानंतर एन्ट्री!


