IPL 2025 : बिहारच्या पठ्ठ्यानं मैदान मारलं! नितीश कुमारांचा आनंद गगनात मावेना, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खास बक्षिस!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nitish Kumar Announces Reward for Vaibhav Suryavanshi : बिहारचा 14 वर्षांचा स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी याने आयपीएलमध्ये इतिहास रचल्यानंतर आता क्रिडाविश्वापासून ते राजकीय वर्तुळातून देखील अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय.
Vaibhav Suryavanshi brilliant knock in IPL 2025 : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सुर्यवंशीने वादळ उठवलं अन् अप्रतिम खेळी केली. वैभवने केवळ ३८ चेंडूत १०१ धावांची वादळी खेळी केली. च्या खेळीत ७ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा समावेश होता. त्याने फक्त ३५ चेंडूत शतक पूर्ण केलं, जे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद आणि एका भारतीय खेळाडूने केलेलं सर्वात जलद शतक ठरलं. १४ वर्षे आणि ३२ दिवसांचा असताना, तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे. अशातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैभवसाठी खास बक्षिस जाहीर केलंय.
काय म्हणाले नितीश कुमार?
आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला बिहारचा वैभव सूर्यवंशी याचं अभिनंदन आणि शुभेच्छा... त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमारांचा वैभवला फोन
advertisement
मी 2024 मध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांना भेटलो होतो आणि त्यावेळी मी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आयपीएलमधील त्याच्या चमकदार कामगिरीनंतर मी त्याचं फोनवरून अभिनंदनही केलं. बिहारमधील तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीलाही राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. वैभव भविष्यात भारतीय संघासाठी नवीन विक्रम रचेल आणि देशाला गौरव देईल अशी माझी इच्छा आहे, असंही नितीश कुमार म्हणाले.
advertisement
आई॰पी॰एल॰ के इतिहास में सबसे कम उम्र (14 साल) में शतक लगाने वाले खिलाड़ी बने बिहार के श्री वैभव सूर्यवंशी को बधाई एवं शुभकामनाएं। वे अपनी मेहनत और प्रतिभा के बलबूते भारतीय क्रिकेट की एक नई उम्मीद बन गए हैं। सभी को उन पर गर्व है। श्री वैभव सूर्यवंशी एवं उनके पिता जी से वर्ष 2024… pic.twitter.com/n3UmiqwTBX
— Nitish Kumar (@NitishKumar) April 29, 2025
advertisement
लिलावात 1.1 कोटींची किंमत
दरम्यान, वैभव सुर्यवंशीला राजस्थान रॉयल्स (RR) ने आयपीएल 2025 च्या लिलावात 1.1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याची आधारभूत किंमत लिलावात 30 लाख होती. वैभवला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससोबत जोरदार बोली लावली आणि अखेरीस 13 वर्षीय या वादळी युवा खेळाडूला आपल्या बाजूने केलं होती. अशातच आता वैभवला संघात घेण्याचा राहुल द्रविडचा निर्णय योग्य ठरत असल्याचं पहायला मिळतंय.
Location :
Bihar
First Published :
April 29, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : बिहारच्या पठ्ठ्यानं मैदान मारलं! नितीश कुमारांचा आनंद गगनात मावेना, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खास बक्षिस!