R Ashwin ने IPL ला रामराम ठोकल्यावर CSK ची पहिली प्रतिक्रिया, अखेर वाद मिटला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CSK On R Ashwin Retirement : मैदानावर पहिली धाव घेण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांवर फिरकीच्या जोरावर वर्चस्व गाजवेपर्यंत, तू आम्हाला सर्व काही दिले आहेस." या पोस्टमध्ये सीएसकेने अश्विनच्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित केलं.
Chennai Super Kings Post For R Ashwin : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार आर अश्विन याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आर अश्विन याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. सीएसकेने अश्विनला 'चेपॉकचा आपला थिरुपुरासुंदरन' (Chepauk’s own. The carrom-ball thiruppura-sundaran) असे खास नाव देऊन त्याच्या योगदानाचा गौरव केला.
CSK ची सोशल मीडिया पोस्ट
सीएसकेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "पिवळ्या जर्सीमध्ये 'अन्बुडेन' (चेपॉकचे लाडके नाव) च्या धुळीच्या मैदानावर पहिली धाव घेण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांवर फिरकीच्या जोरावर वर्चस्व गाजवेपर्यंत, तू आम्हाला सर्व काही दिले आहेस." या पोस्टमध्ये सीएसकेने अश्विनच्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित केलं.
Chepauk’s own.
The carrom-ball thiruppura-sundaran!
From your first run-ups in Yellove on the dusty tracks of Anbuden to absolute spin domination in the world’s grandest arenas, you’ve given us everything.
You’ve pillared our legacy and made Fortress Chepauk roar like…
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 27, 2025
advertisement
थिरुपुरासुंदरन - आर आश्विन
"तू आमच्या वारशाचा आधारस्तंभ होतास आणि 'फोर्ट्रेस चेपॉक' (चेपॉक स्टेडियम) ला तुझ्यासारखे दुसरं कोणीही गर्जना करायला लावली नाही," असंही चेन्नईने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'थिरुपुरासुंदरन' हा शब्द अश्विनच्या अप्रतिम फिरकी गोलंदाजीला, विशेषतः त्याच्या कॅरम बॉलला दिलेली एक अनोखी उपमा आहे.
चेन्नईने मानले आभार
advertisement
आयुष्य एका पूर्ण वर्तुळात येतं. सुपर किंग म्हणून सुरू झालेला प्रवास सुपर किंग म्हणून संपतो. कायमचा सिंह, कायमचा आपल्यापैकी एक असलेला आश्विन आहे. यलो जर्सीमधील आपल्या प्रवासाबद्दल धन्यवाद, असं चेन्नई सुपर किंग्जने म्हटलं आहे.
आयपीएल कारकीर्द
दरम्यान, अश्विनने 2009 मध्ये सीएसकेसोबत आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि 2025 च्या हंगामात तो पुन्हा एकदा सीएसकेमध्ये परतला. मात्र, ब्रेविसला चेन्नईमध्ये घेताना चेन्नई सुपर किंग्जने अधिकचे पैसे दिले, असं म्हणल्याने अश्विनच्या वक्तव्याने वाद पेटला होता. अशातच आता त्याचमुळे अश्विनने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.
view commentsLocation :
Chennai,Tamil Nadu
First Published :
August 27, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
R Ashwin ने IPL ला रामराम ठोकल्यावर CSK ची पहिली प्रतिक्रिया, अखेर वाद मिटला?


