Shikhar Dhawan चा पाय खोलात, ED ने पाठवली गब्बरला नोटीस! टीम इंडियाचा तिसरा खेळाडू अडचणीत
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shikhar Dhawan ED Summons : ईडीच्या चौकशीमध्ये धवनचा संबंध काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजशी जोडला गेल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Shikhar Dhawan News : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकार सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहेत. काही दिवसांपासून हरभजन सिंग आणि सुरैश रैना यांना ईडीने नोटीस पाठवली होती. अशातच आता माजी स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या अडचणी वाढल्या आहेत. एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिखर धवनला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता शिखर धवनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सक्तवसुली संचालनालयाची शिखर धवनला नोटीस
ऑनलाईन बेटिंग ॲपशी संबंधित एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED शिखर धवनला (Shikhar Dhawan ED Summons) समन्स पाठवले आहे. 1xBet नावाच्या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित पैशांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणात धवनने सोशल मीडियावर या ॲपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीने धवनला चौकशीत सहभागी होऊन या प्रकरणातील त्याची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
advertisement
The Enforcement Directorate has summoned cricketer Shikhar Dhawan today at 11 am in a money laundering case connected to the illegal 1xBet betting platform: Officials
— ANI (@ANI) September 4, 2025
कोट्यवधी रुपयांची फसवणूक
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या चौकशीमध्ये धवनचा या ॲप्ससोबतचा संबंध काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजशी जोडला गेला आहे. ईडी या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) धवनचा जबाब नोंदवेल. कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मोठ्या प्रमाणावर करचोरी केल्याचा आरोप असलेल्या अनेक अवैध बेटिंग ॲप्सची ईडी चौकशी करत आहे.
advertisement
हरभजन आणि रैनाही अडचणीत?
गेल्या वर्षापासून अनेक बॉलीवूड, साऊथ फिल्म स्टार्स आणि क्रिकेटपटूंची अशा अवैध बेटिंग ॲप्सचा कथितपणे प्रचार केल्याबद्दल चौकशी सुरू आहे. या यादीत विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, प्रकाश राज, हरभजन सिंग, उर्वशी रौतेला आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात सुरेश रैनाचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. तसेच, गेल्या वर्षी जूनमध्ये सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तपास संस्थेसमोर आपले जबाब नोंदवले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan चा पाय खोलात, ED ने पाठवली गब्बरला नोटीस! टीम इंडियाचा तिसरा खेळाडू अडचणीत


