GT vs CSK :चेन्नईने जाता जाता मुंबई,आरसीबीला दिलं मोठं गिफ्ट, गुजरातच्या पराभवाने पॉईटस टेबलमध्ये उलथा पालथ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चेन्नईने हा विजय मिळवून शेवट गोड केला आहे. तसेच चेन्नईच्या या विजयाने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरूला मोठं गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे याचा फायदा मुंबई आणि आरसीबीला कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात.
GT vs CSK : गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज प्लेऑफमधून बाहेर झालेल्या चेन्नई सूपर किंग्जने 82 धावांनी टेबल टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सला धूळ चारली आहे. चेन्नईने हा विजय मिळवून शेवट गोड केला आहे. तसेच चेन्नईच्या या विजयाने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरूला मोठं गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे याचा फायदा मुंबई आणि आरसीबीला कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर गुजरात टायटन्सने चेन्नई विरूद्धचा सामना जिंकला असता तर त्यांचे गुण 20 झाले असते. या गुणांसह गुजरात टायटन्स क्वालिफाय 1 सामना खेळणारी पहिली टीम ठरली असती. पण चेन्नईच्या या विजयाने आता पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलथा पालथ झाली आहे.
गुजरात आजच्या पराभवानंतर 18 गुणांवर स्थिर राहिल्याने आता मुंबई आणि बंगळुरूला पहिल्या क्रमांकावर पोहोचून क्वालिफायर 1 सामना खेळण्याची शक्यता आहे. जर मुंबईने उद्या पंजाबचा पराभव केला तर मुंबई 18 गुणासह रनरेटच्या बळावर पहिल्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. आणि जर लखनऊ विरूद्ध बंगळुरू हरली तर मुंबईचं टॉपच स्थान कायम राहणार आहे.
advertisement
आता आरसीबी बद्दल बोलायचं झालं तर त्याचे 17 गुण आहे. आता त्यांनी लखनऊ विरूद्धचा सामना जिंकला तर सर्वांधिक गुण मिळवून 19 गुणांसह बंगळुरु टॉपला पोहोचेल, अशा परिस्थितीत बंगळुरू क्वालिफायर 1 सामना खेळण्याची शक्यता आहे.
जर मुंबई विरूद्ध पंजाब जिंकली तर ती आरसीबीप्रमाणे 19 गुणांसह टॉप 2 ला पोहोचेल त्यानंतर रनरेटच्या बळावर आरसीबी आणि पंजाबमध्ये टेबल टॉप ठरेल. त्यामुळे उद्या रंगणाऱ्या मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यानंतर काहीशा गोष्टी स्पष्ट होणार आहे.
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसीद कृष्णा
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (w/c), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs CSK :चेन्नईने जाता जाता मुंबई,आरसीबीला दिलं मोठं गिफ्ट, गुजरातच्या पराभवाने पॉईटस टेबलमध्ये उलथा पालथ