IPL 2026 : ऑक्शनआधीच स्टार खेळाडूला झटका,BCCIने बॉलिंग ॲक्शनवर घेतला आक्षेप, लिलावात UNSOLD राहण्याची भीती

Last Updated:

आयपीएल लिलावाकडे सर्वांचे लक्ष असताना एका स्टार खेळाडूला झटका बसला आहे. या खेळाडूच्या बॉलिंग अॅक्शनवर बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे.त्यामुळे या खेळाडूवर बोली लागणार की तो अनसोल्ड राहणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL Auction 2026
IPL Auction 2026
IPL Auction 2026 : येत्या 16 डिसेंबर 2025 ला आयपीएल 2026 चा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड झाली आहे.तर 10 खेळाडूंमध्ये 77 खेळाडूंची जागा रिक्त आहे.यात 31 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.त्यामुळे आयपीएल लिलावाकडे सर्वांचे लक्ष असताना एका स्टार खेळाडूला झटका बसला आहे. या खेळाडूच्या बॉलिंग अॅक्शनवर बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे.त्यामुळे या खेळाडूवर बोली लागणार की तो अनसोल्ड राहणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू दीपक हुडा आहे. दीपक हुडा 2026 च्या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग संघाने रिलीज केलेले आहे. त्यामुळे आता त्याला पुन्हा लिलावात उतरावे लागणार आहे.पण या लिलावापूर्वी दीपक हुडाला झटका बसला आहे.कारण बीसीसीआयने त्याच्या बॉलिंग अॅक्शनवर आक्षेप घेतला आहे.
advertisement
खरं तर संशयास्पद गोलंदाजी अ‍ॅक्शन असलेल्या खेळाडूंच्या यादीत दीपक हुडा अजूनही आहे. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करणारा 30 वर्षीय दीपक हुडा गेल्या आयपीएल हंगामाप्रमाणेच संशयास्पद श्रेणीत आहे.बीसीसीआयने 16 डिसेंबरच्या लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझींना हुडाच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनबद्दल औपचारिकपणे माहिती दिली.
अर्धवेळ ऑफ-स्पिन गोलंदाजी करणारा हुडा गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात आयपीएल सामन्यांमध्ये खेळला होता, परंतु त्यापैकी एकाही सामन्यात गोलंदाजी केली नाही. परंतू त्याने बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये सहा ओव्हर टाकली आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये एक ओव्हर आणि सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 5 ओव्हर टाकल्या आहेत.
advertisement
दीपक हुडनाने शेवटचा सामना 8 डिसेंबर रोजी राजस्थानविरुद्ध झारखंडविरुद्ध खेळला होता. जर त्याला पुन्हा संशयास्पद अ‍ॅक्शनसाठी बोलावण्यात आले तर त्याला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्याचा धोका आहे. अहमदाबादमधील त्या सामन्यात त्याने तीन ओव्हर टाकली आणि 24 धावा देऊन तीन बळी घेतले होते.
दरम्यान संशयास्पद कृती असलेला दुसरा खेळाडू जम्मू आणि काश्मीरचा आबिद मुश्ताक आहे, जो 29 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज आहे आणि त्याची मूळ किंमत 30लाख रुपये आहे. कर्नाटकचा 29 वर्षीय ऑफ-स्पिनर केएल श्रीजित (लिलाव यादीत 354 वा क्रमांक) याला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी आहे. गेल्या हंगामातच त्याला बंदी घालण्यात आली होती. मध्य प्रदेशचा ऋषभ चौहान (लिलाव यादीत 345 क्रमांक) देखील बंदी यादीत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ऑक्शनआधीच स्टार खेळाडूला झटका,BCCIने बॉलिंग ॲक्शनवर घेतला आक्षेप, लिलावात UNSOLD राहण्याची भीती
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement