'लगा था काट खाएंगे...'; अक्षय खन्नाबद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ, पाहा VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Akshaye Khanna Katrina Kaif : 'रेस'च्या प्रमोशनदरम्यानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ अक्षय खन्नासोबत दिसत आहे.
Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा 'धुरंधर' (Dhurandhar) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या आठ दिवसांतच या चित्रपटाने जवळपास 250 कोटींची कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे. पण अक्षय खन्नाचं कामाचं जगभरात कौतुक होत आहे. 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान अक्षय खन्नाचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अक्षयच्या जुन्या मुलाखतीपासून ते 'तीस मार खान' या चित्रपटातील सीनपर्यंत अक्षयचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच 'रेस'च्या प्रमोशनदरम्यानचा अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय खन्नासोबत कतरिना कैफदेखील दिसत आहे.
कतरिना-अक्षयचा व्हिडीओ व्हायरल (Katrina Kaif Akshaye Khanna Video)
व्हायरल व्हिडीओमध्ये कतरिना कैफ अक्षय खन्नासोबतच्या कामाचा अनुभव शेअर करताना दिसत आहे. कतरिना आपलं कौतुक करत असलेलं पाहून अक्षय खन्नाला मात्र लाजायला झालं आहे. कतरिना म्हणतेय,"अक्षय खन्ना सुरुवातीला जास्त बोलत नव्हता. त्यामुळे मला असं वाटायचं की तो मला खाऊन टाकेल. पण खरंतर तो पूर्णपणे स्वीटहार्ट निघाला. त्याच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले आहे. त्यामुळे सर्वात आधी त्याचे आभार. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला आहे. आजच्या घडीला तो एक उत्तम अभिनेता आहे. तसेच तो एक चांगला व्यक्तीदेखील आहे".
advertisement
#KatrinaKaif on #AkshayeKhanna —
Actually He turned out to be a Sweetheart, and He Even Taught me Chess… We had an Amazing Time on the Film!" ✨🎬
You can Literally see Akshaye Blushing Here!! 😊😅#Bollywood #Dhurandhar 🔥 pic.twitter.com/Leieu1bEHY
— Random Cine Mood (@RandomCineMood) December 11, 2025
advertisement
कतरिना आपलं कौतुक करत असलेलं पाहून अक्षय खन्नाला आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने कतरिनाचे आभारदेखील मानले. अक्षय खन्नाला आजवर आपल्या करिअरमध्ये सहकलाकारांकडून खूप कौतुक मिळालं आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.
अक्षय खन्नासाठी 2025 हे वर्ष सेकंड इनिंग ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा 'छावा' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या कामाचंही कौतुक झालं. आता वर्षाच्या शेवटीची त्याने 'धुरंधर'मध्ये उत्तम काम करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'लगा था काट खाएंगे...'; अक्षय खन्नाबद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ, पाहा VIDEO











