111 कोटी रुपये गायब करण्याचा डाव उलटला, PWD च्या कार्यकारी अभियंत्याचं अखेर निलंबन
- Published by:Sachin S
Last Updated:
बांधकाम विभागामध्ये तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांचा अपहार प्रकरणी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता नितीन भोये यांचं निलंबन करण्यात आलं
विजय पटेल, प्रतिनिधी
जव्हार: मागील दोन दिवसांपासून महसूल विभागामध्ये कारवाईचा धमाका सुरू आहे. अशातच आता बांधकाम विभागामध्ये तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांचा अपहार प्रकरणी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता नितीन भोये यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच एका कॅशियरला सुद्धा निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या111कोटी 63लाख रुपयाच्या सुरक्षा अनामतीवर डल्ला मारण्याचा कट SBI बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चौकस बुद्धीने आणि सतर्कतेने उघडकीस आला होता. हे प्रकरण विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासह 3 आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. या प्रकरणी आता जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना आणि रोखपाल (कॅशियर) अजिंक्य पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. NEWS18 लोकमतने सर्वप्रथम या अपहार कटाचा पर्दाफाश करून बातमी प्रसिद्ध केली होती.
advertisement
तर, दुसरीकडे या प्रकरणी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील 111कोटी 63लाख रुपये अपहार कटातील मुख्य दोन आरोपींना जव्हार न्यायालयाने दिलेला जामीन भिवंडी सिव्हिल न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. जव्हार सार्वजनिक बांधकान विभागातील 111कोटी 63 लाख रुपये ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम हडपण्याच्या कटातील मुख्य दोन आरोपी निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे णि यज्ञेश अंभिरे यांचा जामीन भिवंडी सिव्हिल न्यायालयाकडून रद्द केला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 कोटी 63 लाख रुपयाची सुरक्षा अनामत रक्कम हडपण्याच्या कटातील दोन मुख्य आरोपींच्या विरोधात जव्हार दिवाणी फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं. विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे, यज्ञेश अंभिरे या दोन आरोपींच्या विरोधात जव्हार न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांनी केलेल्या कामाची परत न घेतलेली (UNCLAIM) सुरक्षा अनामत रक्कम सरकारी खात्यात जव्हार SBI बँकेत जमा असते. या सुरक्षा अनामत रकमेतील 111कोटी 63 लाख रुपये परस्पर काढण्याचा कट बँक कर्मचाऱ्याच्या चौकस आणि कर्तव्य दक्षतेमुळे फसला.
advertisement
या अपहार प्रकरणातील आरोपींना दिनांक 28/11/2025 रोजी रात्री उशिरा ठाणे येथून अटक करून दिनांक 29/12/2025 रोजी जव्हार दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना 04/12/2025 पर्यंत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली. 04/12/2025 रोजी पोलीस कस्टडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने 04/12/2025ला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींना 17/12/2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मंजुरीच्या निर्णया विरोधात आर्थिक गुन्हे शाखा पालघर च्या तपास अधिकाऱ्याने भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात 05/12/2025 रोजी अपील अर्ज दाखल केला.
advertisement
05/12/2025च्या अपील अर्जावर 10/12/2025 रोजी भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी व युक्तिवाद होऊन दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी तातडीने रद्द करत दोन्ही आरोपींना 12/12/2025 रोजी जव्हार न्यायालयात शरण जाण्याचा हुकुम दिला. 12 डिसेंबर रोजी दोन्ही आरोपी जव्हार न्यायालयात शरण न आल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा पालघर यांच्या विनंती अर्जानुसार जव्हार न्यायालयाने दोन्ही मुख्य आरोपी निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे आणि यज्ञेश अंभिरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
111 कोटी रुपये गायब करण्याचा डाव उलटला, PWD च्या कार्यकारी अभियंत्याचं अखेर निलंबन










