Prithvi shaw : मी खूप चूका केल्या,वाईट मित्रांचा नाद लागला...,करिअर धोक्यात आल्यानंतर पृथ्वीला चूक कळाली

Last Updated:

पृथ्वी शॉच करिअर धोक्यात आलं होतं. असे असताना आता पृथ्वी शॉला त्याच्या आयुष्यात झालेल्या चुकांची आठवण झाली आहे. एका मुलाखतीत त्याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

Prithvi shaw
Prithvi shaw
Prithvi Shaw News  : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्याशी तुलना होणाऱ्या टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटू पृ्थ्वी शॉची बिकट अवस्था झाली आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर त्याला मुंबईने रणजी ट्रॉफीतून वगळले आहे.त्याला आयपीएलमध्ये कुणीच खरेदीदार मिळालं नाही. त्यामुळे पृथ्वी शॉच करिअर धोक्यात आलं होतं. असे असताना आता पृथ्वी शॉला त्याच्या आयुष्यात झालेल्या चुकांची आठवण झाली आहे. एका मुलाखतीत त्याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.
मला काही वाईट मित्रांचा नाद लागला.त्यामुळे क्रिकेटला खूप कमी वेळ द्यायला सूरूवात केली.त्यानंतक ज्या गरजेच्या गोष्टी नव्हत्या,त्याला जास्त महत्व द्यायला सूरूवात केली.त्यामुळे माझी प्रॅक्टीसही खराब झाली होती. कुठे मी 8 तास प्रॅक्टीस करायचो ते 4 तासांवर आलो होतो. माझ्या आयुष्यातला हा एक काळ होता,असे पृथ्वी शॉ सांगतो. पृथ्वी शॉ न्यूज 24 ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलत होता.
advertisement
चुकीच्या मित्रांमुळे मी वाईट मार्गाला लागलो. पण यात सर्वाधित चुक माझी होती. पण आता या गोष्टी राहिल्या नाहीयेत कारण मी आता स्वत:ला खूप स्ट्रॉग केलं आहे. मी आता एकटं राहायला सूरूवात केली आहे. तसेच ती लोक आता मला मैदानात पाहत नाही. ती भरकटणारी लोकं देखील माझ्यापासून दूर झाली आहे. त्यामुळे ते एकप्रकारे बरंच झालं, आपल्याआपचं रस्ता क्लिअर झाला आणि मला कळून चुकलं की आयुष्य कसं चालतं, असे पृथ्वी शॉ सांगतो.
advertisement
दरम्यान पृथ्वी शॉ पुढे म्हणतो, माझ्या वडिलांनी या सर्वांत मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे पृथ्वी शॉ स्वत:च स्वत:ला त्या ठिकाणी आणू शकतो.त्यामुळे आता त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वी शॉ सांगतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Prithvi shaw : मी खूप चूका केल्या,वाईट मित्रांचा नाद लागला...,करिअर धोक्यात आल्यानंतर पृथ्वीला चूक कळाली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement