लाज वाटली पाहिजे... ड्रेसिंग रुममधला तो वाद, गंभीरने ऑस्ट्रेलियाच्या टेक ऑफआधी अश्विनचं सगळंच काढलं!

Last Updated:

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने आर.अश्विन याच्यावर निशाणा साधला आहे.

लाज वाटली पाहिजे... ड्रेसिंग रुममधला तो वाद, गंभीरने ऑस्ट्रेलियाच्या टेक ऑफआधी अश्विनचं सगळंच काढलं!
लाज वाटली पाहिजे... ड्रेसिंग रुममधला तो वाद, गंभीरने ऑस्ट्रेलियाच्या टेक ऑफआधी अश्विनचं सगळंच काढलं!
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने आर.अश्विन आणि क्रिस श्रीकांत यांच्यावर टीका केली आहे. अश्विन आणि श्रीकांत यांनी भारताच्या वनडे टीममध्ये हर्षित राणाची निवड करण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
'हर्षितची वनडे टीममध्ये निवड करण्यात आली, कारण तो गंभीरचा येस मॅन आहे. हर्षित गंभीरचा आवडता आहे, म्हणून त्याची निवड केली जात आहे', असा आरोप क्रिस श्रीकांत यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर केला. तर अश्विननेही हर्षितची टीम इंडियामध्ये निवड का होत आहे? हे मला माहिती नाही, असं वक्तव्य स्वत:च्या युट्युब चॅनलवर केलं होतं.
advertisement

गंभीरचा पलटवार

'हे लाजिरवाणं आहे, स्वतःचं युट्युब चॅनल चालवण्यासाठी तुम्ही 23 वर्षांच्या मुलाला लक्ष्य करत आहात. तुम्हाला टार्गेट करायचंच असेल, तर मला करा. मी ते हाताळू शकेन, पण तुमच्या युट्युब व्ह्यूजसाठी 23 वर्षांच्या मुलाला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. राणाचे वडील निवड समितीमध्ये नाहीत, तो स्वतःच्या गुणवत्तेवर क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्या मुलाला लक्ष्य करू नका', असा पलटवार गंभीरने केला आहे.
advertisement
हर्षित राणा हा मागच्या काही काळापासून टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटचा खेळाडू झाला आहे, यावरून त्याच्यावर सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणावर टीका सुरू आहे. गंभीरने या मुद्द्यावर बोलताना चाहते आणि मीडियाला जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं. भारतीय क्रिकेटची चिरफाड करण्यापेक्षा त्याला पाठिंबा देण्याचं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे, असं गंभीर म्हणाला आहे.
advertisement

304 दिवसांपूर्वी अश्विन-गंभीरचा वाद

आर.अश्विनने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर अश्विन आणि गंभीर यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या, याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. ब्रिस्बेन टेस्टवेळच्या या फोटोनंतर अश्विनने निवृत्ती घेतल्याचंही बोललं गेलं.
आयपीएल 2024 मध्ये हर्षित राणाने चांगली कामगिरी केली, तेव्हा गंभीर केकेआरचा प्रशिक्षक होता. केकेआर आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला, तर हर्षित राणाचीही टीम इंडियामध्ये निवड झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलियामध्ये हर्षित राणाने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टेस्टमध्ये राणाने 50.70 च्या सरासरीने 4 विकेट घेतल्या. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपसाठीही हर्षित राणाची भारतीय टीममध्ये निवड झाली. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजसाठीही राणा भारतीय टीममध्ये आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
लाज वाटली पाहिजे... ड्रेसिंग रुममधला तो वाद, गंभीरने ऑस्ट्रेलियाच्या टेक ऑफआधी अश्विनचं सगळंच काढलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement