Gautam Gambhir : गुवाहाटी टेस्ट सुरू असताना गंभीरला दिल्लीतून मिळाली गुड न्यूज, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा, प्रकरण काय?

Last Updated:

Delhi high court verdict On Gautam Gambhir : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी आपल्या आदेशात गौतम गंभीर आणि फाउंडेशनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द केला.

Gautam Gambhir case dismissed delhi high court verdict
Gautam Gambhir case dismissed delhi high court verdict
Gautam Gambhir Case dismissed : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. गुवाहाटीवर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता गंभीरला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायरकोर्टाने गंभीरवरील गुन्हा रद्द केला आहे. गेल्या पाच वर्षापासून गंभीरवर खटला होता. त्यातून अखेर गंभीरला दिलासा मिळालाय.

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला खटला 

कोविड-19 साथीच्या काळात औषधांचा साठा आणि विनापरवाना वितरण केल्याच्या आरोपावरून सुरू असलेला गौतम गंभीरविरुद्धचा फौजदारी खटला दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कोर्टाने गंभीरची निर्दोष ठरवलं आहे. यावेळी गंभीरची आई आणि बायको दोघीही अडचणीत आल्या होत्या.

गंभीरची आई आणि पत्नीविरुद्ध तक्रार

advertisement
दिल्ली सरकारच्या ड्रग कंट्रोल डिपार्टमेंटने पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार गौतम गंभीर, त्याची स्वयंसेवी संस्था अपराजिता सिंह, गंभीरची आई सीमा गंभीर आणि पत्नी नताशा गंभीर यांच्याविरुद्ध ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम १८(क) आणि कलम २७(ब)(२) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सीमा गंभीर आणि नताशा गंभीर या संस्थेच्या विश्वस्त आहेत.

तुरुंगवासाची तरतूद

advertisement
परवान्याशिवाय औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण करण्यास मनाई आहे. कायद्यानुसार वैध परवान्याशिवाय औषधांची विक्री आणि वितरण केल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र, आता कोर्टाने गंभीर आणि त्याच्या कुटूंबियांना निर्दोष सिद्ध केलं आहे.

फाउंडेशनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द

दरम्यान, कोरानाकाळात औषधांचा साठा करून त्याचे वाटप केल्याप्रकरणी गंभीर फाउंडेशनविरोधात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी आपल्या आदेशात गौतम गंभीर आणि फाउंडेशनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द केला. कोविड काळात औषधांचा साठा करून वाटप केला, असा आरोप त्याच्यावर केला गेला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : गुवाहाटी टेस्ट सुरू असताना गंभीरला दिल्लीतून मिळाली गुड न्यूज, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement