IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी गंभीरने पाच खेळाडूंना दिला होमवर्क, ड्रेसिंग रुममध्ये तयार केला WTC चा फुल प्लॅन!

Last Updated:

Gautam Gambhir Gives Homework : साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, देवदत्त पडिक्कल आणि नारायण जगदीसन हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये मैदानात उतरण्यास सज्ज आहेत.

Gautam Gambhir Gives Homework
Gautam Gambhir Gives Homework
Indian Cricket team : दिल्ली टेस्ट जिंकल्यानंतर आता हेड कोच गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक होताना दिसतंय. गंभीरने देखील विजयानंतर आनंद व्यक्त केला होता. अशातच आता टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दोन टप्प्यात संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. अशातच ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच गंभीरने WTC चा फुल प्लॅन तयार केला आहे.

पाच खेळाडूंना होमवर्क

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत सहभागी नसलेले साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, देवदत्त पडिक्कल आणि नारायण जगदीसन हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. दुखापतीतून पुनरागमन करणारा विकेटकीपर ऋषभ पंतदेखील दिल्लीच्या दुसऱ्या फेरीतील रणजी मॅचमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे.

फर्स्ट क्लास मॅच बेस्ट

advertisement
एकदिवसीय सिरीज संपताच केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा त्यांच्या राज्याच्या रणजी संघांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे दोन कसोटींची मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनाही महत्त्वाचा गेम टाईम मिळेल. फर्स्ट क्लास मॅचपेक्षा कसोटी क्रिकेटसाठी दुसरी कोणतीही चांगली तयारी नाही, हे गंभीर याने स्पष्ट केलं आहे.
advertisement

एनसीएमध्ये जाण्यापेक्षा रणजी खेळा

पण पुन्हा, जे खेळाडू फक्त कसोटी क्रिकेटचा भाग आहेत, त्यांच्यासाठी तयारी करणे आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणे खूप, खूप महत्त्वाचे आहे, असं मला वाटते. फक्त एनसीएमध्ये जाऊन त्यांच्या कौशल्यांवर काम करण्याऐवजी, ते जेवढ्या जास्त मॅच खेळतील, तेवढे ते संघासाठी महत्त्वाचे आहे, असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
advertisement

रणजी ट्रॉफी खेळणं तितकंच महत्त्वाचं

दरम्यान, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी रणजी ट्रॉफी खेळणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मला वाटतं की ही एक अशी गोष्ट आहे जी खेळाडूंनी खूप चांगली केली आहे. ते कसोटी मालिकेसाठी स्वतःला खऱ्या अर्थाने तयार करत आहेत आणि तिथंच तुम्हाला त्याचे परिणाम देखील दिसू शकतील, असंही गौतम गंभीर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी गंभीरने पाच खेळाडूंना दिला होमवर्क, ड्रेसिंग रुममध्ये तयार केला WTC चा फुल प्लॅन!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement