Weather Alert: विजा कडाडणार, कोकणात पुन्हा कोसळणार, मुंबई-ठाण्यासाठी IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे पुन्हा मोठे बदल जाणवत असून कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढला असून ‘ऑक्टोबर हीट’चे चटके जाणवत आहेत. अशातच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड, ठाणे आणि नवी मुंबई भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मात्र कोरडे आणि उकाड्याचे वातावरण राहील.

advertisement
2/5
मुंबईत आज आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढेल आणि दिवसभर दमट उकाडा जाणवेल. दुपारी तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर आर्द्रता 70 टक्क्यांपेक्षा अधिक राहील. समुद्रकिनाऱ्याजवळील भागांमध्ये हलकी झुळूक वाहील पण उकाडा कमी होणार नाही. संध्याकाळनंतर काही ठिकाणी किंचित गारवा जाणवेल

3/5
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी आज हवामान बदलत्या स्वरूपाचं राहील. सकाळी ऊन असलं तरी दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याची चिन्हं आहेत. काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील. तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रता जास्त असल्याने दमट वातावरण जाणवेल. संध्याकाळी किनारपट्टीकडून वाहणारे वारे थोडासा दिलासा देतील.

4/5
पालघर जिल्ह्यात आज पावसापेक्षा उन्हाचाच तडाखा जाणवेल. तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर आकाश स्वच्छ राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाने विश्रांती घेतली असून नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवेल. ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास वारे मंदपणे वाहतील, पण उन्हाचा तडाखा कायम राहील.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही कोकणातील जिल्ह्यांना आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. रायगडमध्ये हलक्या ते मध्यम सरी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील. सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील आणि आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाड्यासह पावसाचा अनुभव मिळेल. तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, वारे मंदगतीने वाहतील.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement