T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गंभीरचे प्रयोग फेल? टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी धडधड वाढवणारं वक्तव्य!

Last Updated:

Gautam Gambhir On T20 World Cup 2026 : टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरपासून लोवर ऑर्डरमध्ये अनेक बदल झाले होते. अशातच आता गंभीरने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Gautam Gambhir On T20 World Cup 2026
Gautam Gambhir On T20 World Cup 2026
Gautam Gambhir BCCI Video : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने टी-ट्वेंटी मालिकेत विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गौतम गंभीरने मोठा डाव खेळला. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्लेयर्स खेळत नसल्याने गंभीरने टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठे बदल केले होते. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरपासून लोवर ऑर्डरमध्ये अनेक बदल झाले होते. अशातच आता गंभीरने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

खोल समुद्रात फेकून दिलं पाहिजे - गंभीर

एक देश म्हणून आणि आम्ही व्यक्ती म्हणून, कधीही मालिका पराभव साजरा करत नाही, असं गौतम गंभीर म्हणाला. खेळाडूंच्या नेतृत्वावर दबावाखाली असलेल्या खेळाडूची चाचणी घेतल्यानं त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन होतं असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे. गंभीरने यावेळी शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याचं उदाहरण दिलं. खेळाडूंना खोल समुद्रात फेकून दिलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना आपोआप पोहता येतं. तिथंच त्यांची खरी कसोटी असते, असंही गौतम गंभीर म्हणाला आहे.
advertisement

ड्रेसिंग रूममध्ये खूप पारदर्शकता - गौतम गंभीर

advertisement
मुलांना खोल समुद्रात फेकून द्या, ही सर्वात सोपी पद्धत आहे. शुभमन गिलला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करताना आम्ही त्याच्यासोबतही असंच केलं, अशी कबुली देखील गौतम गंभीरने दिली आहे. तसेच ड्रेसिंग रूममध्ये खूप पारदर्शकता आहे. ही एक अतिशय प्रामाणिक ड्रेसिंग रूम आहे आणि आम्हाला ती तशीच ठेवायची आहे, असं देखील गंभीर म्हणाला.
advertisement

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया तयार नाही - हेड कोच

टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी कामगिरीवर गंभीरने मोठं वक्तव्य केलं. मला वाटतं की, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया पूर्णपणे तयार नाही. आपण जिथे पोहोचायला हवे होते तिथे पोहोचलो नाही, असं वक्तव्य गौतम गंभीर याने केलं आहे. म्हणून आशा आहे की, खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याचं महत्त्व समजेल. आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथं पोहोचण्यासाठी आपल्याकडे तीन महिने शिल्लक आहेत, असंही गंभीर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गंभीरचे प्रयोग फेल? टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी धडधड वाढवणारं वक्तव्य!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement