भारतासाठी गोल्ड जिंकणाऱ्या खेळाडूचा नातू मुंबईला बनवणार 'चॅम्पियन',कोण आहे Raj Angad Bawa?

Last Updated:

या सामन्यात मुंबई इंडियन्सने हॉकीमध्ये भारताला गोल्ड जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या नातवाला संघात स्थान दिले आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.

gt vs mi eliminator
gt vs mi eliminator
Who is Raj Angad Bawa?, GT vs MI Eliminator : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामन्याला सुरूवात झाली आहे.या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स प्रथम गोलंदाजी करावी लागणार होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हॉकीमध्ये भारताला गोल्ड जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या नातवाला संघात स्थान दिले आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
राज अंगद बावा हा भारताच्या १९४८ च्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघातील सदस्य तरलोचन बावा यांचा नातू आहे.स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताचे ते पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक होते. राजचे आजोबा वारले तेव्हा तो फक्त पाच वर्षांचे होतो. तरीही घरातील कथा आणि सुवर्णपदक त्याच्यावर खोलवर छाप सोडले.
राज हा २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. जिथे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला जिंकण्यास मदत केली. त्याने पाच विकेट्स घेतल्या आणि 35 धावा काढल्या, आयसीसीच्या अंतिम सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय ठरला होता.
advertisement
राज हा स्थानिक क्रिकेटमध्ये चंदीगडकडून खेळतो आणि ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ६३३ धावा केल्या आहेत आणि १३ विकेट्स घेतल्या आहेत. २०२५ च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांना घेतले. यापूर्वी तो २०२२ मध्ये पंजाब किंग्जसोबत होता तेव्हा त्याने २ सामने खेळले होते पण २०२३ मध्ये एकही सामना खेळू शकला नाही आणि २०२४ च्या लिलावापूर्वी त्याला सोडण्यात आले.
advertisement
खरं तर आजचा सामना चंदीगडच्याच मैदानावर आहे.त्यामुळे राज बावा आपल्या होमग्राऊंडवर कसा खेळतो? मुंबईला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (w), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), साई सुधारसन, कुसल मेंडिस (डब्ल्यू), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतासाठी गोल्ड जिंकणाऱ्या खेळाडूचा नातू मुंबईला बनवणार 'चॅम्पियन',कोण आहे Raj Angad Bawa?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement