Hardik Pandya : ड्रेसिंग रुममध्ये जाण्याआधी गर्लफ्रेंडला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं अन् LIVE सामन्यात दिली फ्लाईंग किस! पाहा Video

Last Updated:

Hardik Pandya Promiss to Girl Friend : हार्दिक पांड्याने साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पाचव्या मॅचमध्ये आपल्या फलंदाजी दरम्यान दाखवलेल्या अफाट आत्मविश्वासामागचे गुपित उघड केलं.

Hardik Pandya Girl Friend Promiss
Hardik Pandya Girl Friend Promiss
Hardik Pandya Girl Friend Promiss : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने या मॅचमध्ये अवघ्या 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्मा याच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडविरुद्ध अशीच फटकेबाजी केली होती. हार्दिकने अखेरपर्यंत आपली आक्रमक लय कायम ठेवत 25 बॉलमध्ये 63 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या योगदानामुळे भारताला बोर्डावर 231 रन्सचा विशाल स्कोर उभा करता आला. मात्र, फिफ्टी मारल्यावर हार्दिकने जे केलं ते पाहून सर्वांनी डोळे झाकले.

गर्लफ्रेंडला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं

फिफ्टी मारल्यावर हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंडला फ्लाईंग किस दिली. त्यावेळी त्याने गर्लफ्रेंडला दिलेलं प्रॉमिस देखील पूर्ण केलं. हार्दिक पांड्याने साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पाचव्या मॅचमध्ये आपल्या फलंदाजी दरम्यान दाखवलेल्या अफाट आत्मविश्वासामागचे गुपित उघड केलं. त्याने सांगितले की, क्रीजवर जाण्यापूर्वीच त्याने आपल्या गर्लफ्रेंडला सांगितलं होतं की, तो पहिल्याच बॉलवर पुढे सरसावून सिक्स मारण्याचा प्रयत्न करेल. हार्दिकच्या मते, त्याला पूर्ण विश्वास होता की तो यामध्ये यशस्वी होईल.
advertisement

कॅल्क्युलेटेड रिस्क पथ्यावर पडली

हार्दिकने म्हटलं की, त्यावेळची स्थिती त्याच्या खेळण्याच्या शैलीला अगदी साजेशी होती, त्यामुळे त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि ती रणनीती यशस्वी ठरली. हार्दिकने याला एक 'कॅल्क्युलेटेड रिस्क' म्हणजेच मोजून-मापून घेतलेली जोखीम म्हटलं, जी त्याच्या पथ्यावर पडली.
advertisement

मेहनत एकत्रितपणे फळ देते

आपल्या पुनरागमनाबद्दल आणि शानदार फॉर्मबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, त्याला नेहमीच आव्हानांचा आनंद वाटतो. खेळाप्रती आपला दृष्टिकोन स्पष्ट करताना तो म्हणाला की, आयुष्यात कितीही अडथळे किंवा सेटबॅक आले तरी, आधीपेक्षा अधिक चांगले आणि मजबूत होऊन परतणं, हेच त्याचे नेहमीचे लक्ष्य असतं, जेणेकरून तो टीमवर मोठा प्रभाव टाकू शकेल. जेव्हा तुमचे सर्व प्लॅनिंग आणि मेहनत एकत्रितपणे फळ देतात, तेव्हा खूप समाधान मिळतं, असंही हार्दिक पांड्या म्हणाला.
advertisement

पहिला भारतीय ऑलराऊंडर खेळाडू

दरम्यान, पाचव्या मॅचमध्ये शानदार खेळीसोबतच हार्दिक पांड्याने एका खास क्लबमध्ये आपली वर्णी लावली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 पेक्षा जास्त रन्स आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या जगातील निवडक खेळाडूंच्या यादीत आता हार्दिकचे नाव सामील झाले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ऑलराऊंडर खेळाडू ठरला आहे. त्याच्या या अष्टपैलू खेळामुळे टीम इंडियाला मॅचमध्ये मोठी मजबुती मिळाली असून दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरना त्याने पूर्णपणे निष्प्रभ केलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : ड्रेसिंग रुममध्ये जाण्याआधी गर्लफ्रेंडला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं अन् LIVE सामन्यात दिली फ्लाईंग किस! पाहा Video
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement