Hardik Pandya : पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये घुसखोरी, हार्दिक पांड्यासोबत काय घडलं? रुममध्ये मिळाली निनावी चिठ्ठी!

Last Updated:

Hardik Pandya, Asia Cup : टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.

Hardik Pandya in Dubai share Post with fan letter
Hardik Pandya in Dubai share Post with fan letter
Hardik Pandya Dubai Post : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा खेळासोबतच आपल्या स्टायलिश लूकमुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. आशिया कपमध्ये पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभूत केल्यानंतर हार्दिकने एका खास पत्राचा खुलासा केला आहे. हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही स्टायलिश फोटोंसोबत एक 'स्पेशल चिट्ठी' (Special Letter) शेअर केली होती. त्यामुळे अनेक चर्चा होताना दिसत आहे.

रूममध्ये येण्याची संधी दिली 

हार्दिकच्या फॅनने हे पत्र पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 मॅचपूर्वी लिहिले होते. या भावनिक पत्रात लिहिले आहे. "प्रिय हार्दिक, हे पत्र मी तुम्हाला धन्यवाद... देण्यासाठी लिहीत आहे, कारण तुम्ही माझ्याशी खूप चांगले वागलात आणि मला तुमच्या रूममध्ये येण्याची संधी दिलीत. मी मोठा होऊन तुमच्यासारखा बनू इच्छितो. फॅनने हार्दिकला पुढील मॅचसाठी शुभेच्छा देत लिहिले होतं की, "उद्याच्या मॅचमध्ये तू खूप रन्स काढशील आणि विकेट्स देखील घेशील. त्याने भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
advertisement
advertisement

हार्दिकच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिकने टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर हे प्रेमळ पत्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. चाहत्यांनी हार्दिकच्या या पोस्टवर प्रचंड प्रतिसाद दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 मॅचमध्ये टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत 6 विकेट्सने विजय मिळवला. या मॅचमध्ये हार्दिकने बॉलिंगमध्ये 3 ओव्हर टाकल्या आणि एक विकेट घेतली. तर बॅटिंगमध्ये तो 7 रन्स करून नाबाद राहिला होता.
advertisement

फायनलमध्ये पांड्या जिंकवून देणार? 

दरम्यान, हार्दिक पांड्याने आशिया कपसाठी खास केस कलर केले आहेत. पांढऱ्या केसांची पांड्याची स्टाईल अनेकांना आवडल्याचं पहायला मिळतंय. तर पांड्या आपल्या ऑलराऊंडर कामगिरीने देखील सर्वांना चकित करत असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये पांड्या कशी कमागिरी करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये घुसखोरी, हार्दिक पांड्यासोबत काय घडलं? रुममध्ये मिळाली निनावी चिठ्ठी!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement