शिखर धवन मिताली राजसोबत लग्न करणार? गब्बरने स्वत: केला खुलासा

Last Updated:

शिखर धवनने जिओ सिनेमावर धवन करेंगे शोमध्ये मिताली राज सोबत नात्यासंदर्भात होत असणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं.

News18
News18
मुंबई : भारताचा सलामीवीर शिखर धवन बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. आता त्याच्या एका शो मुळे धवन चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धवनचं पुनरागमन आता अशक्य मानलं जात आहे. दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल हंगामातसुद्धा तो बाहेर पडला. पंजाब किंग्जमध्ये धनवच्या जागी काही सामन्यात सॅम करनने नेतृत्व केलं. धवनने त्याच्या निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. दरम्यान, आता स्वत:बद्दल सुरू असलेल्या उलट सुलट चर्चेवरही त्यानं उत्तर दिलं असून यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला.
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने म्हटलं की, "मी ऐकलं होतं की संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत माझं लग्न होणार आहे." शिखर धवनने जिओ सिनेमावर धवन करेंगे शोमध्ये मिताली राज सोबत नात्यासंदर्भात होत असणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं. मिताली राज सध्या वुमन प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सची मेंटर आहे. धवनने स्वत:च आपण असं ऐकल्याचं म्हटल्यानं त्याच्या आणि मितालीच्या लग्नाच्या अफवा होत्या हे स्पष्ट झालं.
advertisement
शिखर धवनने या शोमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचं कौतुक केलं. ऋषभ पंत दीड वर्षानंतर अपघातातून सावरला असून मैदानावर जबरदस्त पुनरागमन केलं. त्याची टी२० वर्ल्ड कप संघातही निवड झाली. धवन म्हणाला, अपघातानंतर ज्या पद्धतीने धवनने स्वत:ला सावरलं त्याचं कौतुक करतो. त्याने सकारात्मकता आणि धैर्य दाखवलं ते जबरदस्त आहे. त्याने ज्या पद्धतीने आय़पीएल खेळलं आणि भारतीय संघात जागा मिळवली ते अविश्वसनीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
advertisement
आयपीएलमध्ये शिखर धवनला यंदाच्या हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पंजाब किंग्जच्या संघाला पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर रहावं लागलं. तर धवनने यंदाच्या हंगामात ५ सामन्यात खेळताना १५२ धावा केल्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शिखर धवन मिताली राजसोबत लग्न करणार? गब्बरने स्वत: केला खुलासा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement