IND vs PAK सामना होणार नाही! ICC चा मोठा निर्णय, पाकिस्तानला दिला जबरदस्त दणका

Last Updated:

आयसीसीची कुठलीही स्पर्धा म्हटली तर भारत पाकिस्तान या दोन देशांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असते. पण आता पहिल्यांदाच भारत पाकिस्तान यांच्यात सामने होणार नाही आहेत. कारण आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पाकिस्तान मोठा धक्का बसला आहे.

ind vs pak
ind vs pak
ICC U19 World Cup 2026 : आयसीसीची कुठलीही स्पर्धा म्हटली तर भारत पाकिस्तान या दोन देशांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असते. पण आता पहिल्यांदाच भारत पाकिस्तान यांच्यात सामने होणार नाही आहेत. कारण आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पाकिस्तान मोठा धक्का बसला आहे.इतकंच आयसीसीने हा निर्णय घेऊन पाकिस्तानला त्यांची घरी जागा दाखवली आहे. त्यामुळे नेमका आयसीसीने काय निर्णय घेतला आहे? हे जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)आज अंडर 19 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकातून आयसीसीने पाकिस्तानला मोठ झटका दिला आह. आयसीसीने पाकिस्तानला भारताच्या गटातून काढून टाकले आहे.त्यामुळे आता गट टप्पा पार केला तर पाकिस्तानला भारताशी भिडता येणार आहे. जर हा टप्पा पार केला नाहीच तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्ठात येण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर आतापर्यंत अनेक आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात राहिले आहेत.त्यामुळे साखळी फेरीत देखील दोन्ही संघाचे हायव्होल्टेज सामने पार पडायचे.पण आता अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघाना वेगवेगळ्या गटात ठेवले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन संघात सामना होण्याची शक्यता कमी आहे.
पाच वेळा विजेता भारत गट अ मध्ये आहे, तर दोन वेळा विजेता पाकिस्तान गट ब मध्ये आहे.आता जर पाकिस्तान गट टप्प्याच्या पुढे गेल्यास सुपर-6 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडू शकणार आहेत.
advertisement
चारही गटांपैकी प्रत्येकी तीन संघ सुपर-६ मध्ये पोहोचतील. भारत आणि पाकिस्तानला पात्रता फेरीत कोणतीही अडचण येऊ नये. भारताच्या गटात बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. पाकिस्तानच्या गटात झिम्बाब्वे, इंग्लंड आणि स्कॉटलंडचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी अमेरिकेविरुद्ध आहे. पाकिस्तानचा पहिला सामना 16 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध आहे. भारत बुलावायोमध्ये तिन्ही सामने खेळेल, तर पाकिस्तान हरारेमध्ये तिन्ही सामने खेळेल. दोन्ही संघांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
advertisement
गट अ - भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड.
गट ब - झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड.
भारत आणि पाकिस्तानने कधी विजेतेपद जिंकले?
भारतीय 19 वर्षांखालील संघाने 1999-00,2007-08, 2012, 2017-18 आणि 2021-22 मध्ये विजेतेपद जिंकले. पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाने2003-04 आणि 2005-06 मध्ये विजेतेपद जिंकले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामना होणार नाही! ICC चा मोठा निर्णय, पाकिस्तानला दिला जबरदस्त दणका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement