Sleep Tourism : काय आहे ‘स्लीप टुरिझम’? ज्याच्याकडे लाखो लोक होतायत आकर्षित, भारतात या ठिकाणी घेऊ शकता आनंद

Last Updated:

आज एक अनोखा ट्रेंड वेगानं लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे ‘स्लीप टुरिझम’. आता तुम्ही टुरिझम ऐकलं असेल पण स्लीप टुरिझम अनेकांसाठी नवीन आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या धावपळीच्या जगात शांत झोप मिळणं ही अनेकांसाठी लक्झरी झाली आहे. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन टाइम, कामाचा ताण, अनियमित दिनचर्या या सगळ्यामुळे झोपेची कमतरता मोठी समस्या बनली आहे. त्यामुळेच आज एक अनोखा ट्रेंड वेगानं लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे ‘स्लीप टुरिझम’. आता तुम्ही टुरिझम ऐकलं असेल पण स्लीप टुरिझम अनेकांसाठी नवीन आहे.
यात लोक प्रवासाचा मुख्य उद्देश फक्त एकच ठेवतात, तो म्हणजे चांगली, गाढ, ताजेतवाने पणा देणारी झोप आणि म्हणूनच हा ट्रेंड फक्त लग्झरी नाही, तर स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यातील गुंतवणूक मानला जातो.
स्लीप टुरिझम म्हणजे नेमकं काय?
नाव ऐकून आश्चर्य वाटतं, पण अर्थ खूप सोपा आहे. जिथे तुमचा प्रवासाचा उद्देश sightseeing नाही, म्हणजे कुठेही फिरणं, ठिकानांना भेट देणं, ट्रेकिंग करणं असं नाही, शिवाय यात पार्टी करण, ड्रिंक घेणं ही येत नाही, यात येतो तो फक्त आणि फक्त आराम. म्हणजेच काय तर रिलॅक्सेशन आणि स्लीप थेरेपी असते, त्यालाच स्लीप टुरिझम म्हणतात.
advertisement
जगभरातील अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आता खास स्लीप-फ्रेंडली सुविधा देत आहेत जसं:
पूर्ण काळोख देणारे ब्लॅकआउट रूम्स, नो-नॉइज, शांत वातावरण, प्रीमियम गादी आणि रिलॅक्स देणाऱ्या गादी आणि उशा, स्लीप इंड्युसिंग स्पा आणि मसाज, योग, मेडिटेशन, अरोमाथेरपी सेशन्स. काही ठिकाणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खास स्लीप प्रोग्राम्स
लोक स्लीप टुरिझमकडे का आकर्षित होत आहेत?
आजच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे झोप ही गरज नसून प्रायोरिटी झाली आहे.
advertisement
लोक हा ट्रेंड का पसंत करत आहेत?
ताण कमी करण्यासाठी तसेच नोकरी, घर, जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मनाला शांतता देणारी सुट्टी आवश्यक होते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतात तब्बल 61% लोक 6 तासांपेक्षा कमी झोपतात, त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो.
आता झोपही डाएट आणि फिटनेसइतकीच महत्त्वाची मानली जाते.
डिजिटल डिटॉक्स फोन-लॅपटॉपपासून दूर राहून मनाला ‘रिसेट’ करण्याचा मार्ग. सोशल मीडियाचा प्रभाव Instagram वर शांत जंगल, योग रिट्रीट्स, स्पा-थेरपींचं आकर्षण वाढतंय.
advertisement
भारतामध्ये कुठे अनुभवता येईल स्लीप टुरिझम?
भारतामध्येही अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी खास झोप आणि रिलॅक्सेशनसाठी ओळखली जातात:
1. आनंदा इन द हिमालयाज, ऋषिकेश
योग निद्रा, ध्यान, शिरोधारा मन शांत करण्यासाठी आदर्श जागा आहे.
2. आत्मनन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी
रेस्ट & रीजुवेनेशन प्रोग्राम, निसर्गाच्या सान्निध्यात.
3. स्वास्वरा, गोकर्णा
टेक-फ्री लाइफस्टाइल, आयुर्वेदिक उपचार आणि समुद्राची शांती.
advertisement
4. वन, देहरादून
साउंड हीलिंग, जंगलासारखं वातावरण आणि पूर्ण रिलॅक्सेशन.
स्लीप टुरिझम हा फक्त सुट्टीचा नवा ट्रेंड नाही, तर आधुनिक जगण्याची गरज बनत चालला आहे.
मन शांत करण्यासाठी, शरीर रिलॅक्स करण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे एक परफेक्ट पर्याय ठरत आहे. गर्दीपासून दूर, कोणत्याही ताणतणावाशिवाय, फक्त स्वतःसाठी घेतलेली शांत सुट्टी. यालाच म्हणतात स्लीप टुरिझम: झोपेच्या माध्यमातून आरोग्याची पुनर्बांधणी.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Sleep Tourism : काय आहे ‘स्लीप टुरिझम’? ज्याच्याकडे लाखो लोक होतायत आकर्षित, भारतात या ठिकाणी घेऊ शकता आनंद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement