Ind vs Pak Final :दुबईत भारताची 'विजया'दशमी!पाकिस्तानच्या गर्वाच दहन, टीम इंडियाचा नववे विक्रमी विजेतेपद
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने बाजी मारली आहे. भारताने 5 विकेटने हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.
India vs Pakistan Final Asia Cup 2025 : आशिया कपच्या फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने बाजी मारली आहे. भारताने 5 विकेटने हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यतकता होती. त्यावेळी तिलक वर्माने 3 बॉलमध्ये 9 धावा काढल्या होत्या. त्यानंतर चौथ्या बॉलवर एक धाव हवी असताना रिंकून चौकार मारून भारताला सामना जिंकवला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा ठरला आहे. त्याने नाबाद 69 धावांची खेळी केली आहे. या व्यतिरीक्त भारताच्या विजयाचं क्रेडीट कुलदीप शर्माला देखील जाते कारण त्याने 4 विकेट काढल्या होत्या.
पाकिस्तानने दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती. कारण टीम इंडियाकडून सलामीली आलेला अभिषेक शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव मैदानात उतरला होता.मात्र तो देखील 1 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर शुभमन गिल आणि तिलक वर्मा भारताचा डाव सावरेल असे वाटत होते.पण शुभमन गिल 12 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर संजू सॅमसन चांगला खेळत होता. पण तो देखील 24 धावा करून बाद झाला.त्याच्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा मैदानात होते. हे दोघे मैदानात असताना टीम इंंडियाची हातून मॅच निसटली होती. त्यामुळे भारत सामना जिंकण्याची शक्यता खूप कमी होती.
advertisement
पण तिलक वर्माने एका बाजूने भारताचा डाव सावरून ठेवला.यावेळी त्याला शिवम दुबनेही चांगली साथ दिली होती. दुबेने मोक्याची क्षणी 33 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या विजयाच्या नजीक पोहोचली होती. कारण टीम इंडियाला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती.त्यावेळी तिलकने पहिल्या बॉलवर 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिक्स खेचला, याच क्षणी संपूर्ण मॅच भारताच्या पारड्यात आली.त्यानंतर 4 बॉलवर 2 धावांची गरज असताना तिलकने एक धाव काढली.त्यानंतर रिंकून चौथ्या बॉलवर चौकार मारून भारताला आशिया कपं जिंकून दिला.
advertisement
या सामन्यात तिलक वर्मा 69 धावांवर नाबाद राहिला. या खेळी दरम्यान त्याने 4 षटकार आणि 3 चौकार मारले होते.त्यामुळे भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार तो ठरला आहे. भारताने नवव्यांदा हा आशिया कप जिंकला आहे. या विजयासह खेळाडूने देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाकिस्तानचा डाव
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 146 धावांवर ऑल आऊट झाली होती.पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली होती. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमानने पाकिस्तानच्या डावाला आक्रामक सूरूवात करून दिली.साहिबजादा फरहानने 57 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 5 चौकार लगावले होते. फरहानला फखर जमाननेही चांगली साथ दिली होती. दोघांनी मिळून 84 धावांवर एकही विकेट जाऊ दिली होती.त्यानंतर मात्र फरहाण बाद झाला होता.त्यानंतर फखर जमान आणि सॅम अयुबने पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण सॅम अयुब पुन्हा अपयशी ठरला आणि 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या विकेटसची रांगच लागली. फखर जमान 46 धावांवर बाद झाला. या व्यतिरीक्त इतर 8 खेळाडूंना 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. आणि पाकिस्तान 146 धावांवर ऑलआऊट झाली होती. भारताकडून कुलदीप यादवने 4, बुमराह,चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
ACC आशिया कप विजेतेपदांची यादी
हंगाम फॉरमॅट विजेता
1984 ODI भारत
1986 ODI श्रीलंका
1988 ODI भारत (2)
1990/91 ODI भारत (3)
1995 ODI भारत (4)
1997 ODI श्रीलंका (2)
2000 ODI पाकिस्तान
2004 ODI श्रीलंका (3)
2008 ODI श्रीलंका (4)
2010 ODI भारत (5)
2012 ODI पाकिस्तान (2)
2014 ODI श्रीलंका (5)
advertisement
2016 T20I भारत (6)
2018 ODI भारत (7)
2022 T20I श्रीलंका (6)
2023 ODI भारत (8)
2025 T20I भारत (9)
भारताची प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 12:07 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Pak Final :दुबईत भारताची 'विजया'दशमी!पाकिस्तानच्या गर्वाच दहन, टीम इंडियाचा नववे विक्रमी विजेतेपद