रश्मिका मंदाना देतेय तमन्ना भाटियाला टक्कर, THAMA च्या नव्या गाण्यामध्ये दिसला बोल्ड अवतार, धमाकेदार टीझर रिलीज

Last Updated:

Thama Movie First Song : अभिनेता आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि आता त्यातील ‘तुम मेरे न हुए’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या हॉरर-कॉमेडीचा फॉर्म्युला हिट ठरत असताना, एका बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धम्माल ट्रेलर आला, आणि आता लगेचच या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ उडाला आहे!
अभिनेता आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि आता त्यातील ‘तुम मेरे न हुए’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
या टीझरमध्ये रश्मिका मंदानाचा अत्यंत बोल्ड आणि सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. रश्मिका आणि आयुष्मानचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. विशेष म्हणजे, रश्मिकाचा हा लुक काही चाहत्यांना अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यातील लुकची आठवण करून देत आहे.
advertisement

व्हॅम्पायरची प्रेम कहाणी

advertisement
‘तुम मेरे न हुए’ या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे की, “प्रत्येक मुलीच्या प्रेमाचा आणि हृदय तुटण्याचा आवाज ऐका.” हे पूर्ण गाणं लवकरच रिलीज होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हॉरर आणि कॉमेडीचा धमाकेदार तडका आहे. नवाजुद्दीन आणि परेश रावलच्या कॉमेडीने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘थामा’ची कथा एका व्हॅम्पायरच्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. यात आयुष्मान रश्मिकाला भेटल्यावर वैम्पायर बनतो आणि त्याला सुपर नॅचरल पॉवर्स मिळतात.
advertisement
दिनेश विजन आणि अमर कौशिकने निर्मिती केलेला आणि आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
रश्मिका मंदाना देतेय तमन्ना भाटियाला टक्कर, THAMA च्या नव्या गाण्यामध्ये दिसला बोल्ड अवतार, धमाकेदार टीझर रिलीज
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement