Shubman Gill : गिलला नेमकं कोण वाचवतंय? T20 मध्ये टेस्ट खेळला 'प्रिन्स', एकट्यासाठी टीम पणाला लावली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग पुन्हा एकदा कोसळली आहे. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने 8 विकेट गमावून 167 रन केल्या.
क्वीन्सलँड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग पुन्हा एकदा कोसळली आहे. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने 8 विकेट गमावून 167 रन केल्या, या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल याने सर्वाधिक 46 रनची केली, पण यासाठी त्याने 39 बॉल घेतले. गिलने या सामन्यात 117.95 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना 4 फोर आणि एक सिक्स मारला. आशिया कपपासून गिलचं टीम इंडियात कमबॅक झालं, पण त्यानंतर गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये गिलला अर्धशतक ठोकून आता वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे, पण अजूनही गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत आहे.
शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये कमबॅक झाल्यानंतर त्याला उपकर्णधारही करण्यात आलं. एवढंच नाही तर त्याच्यासाठी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल केले गेले, पण या निर्णयाचा ना टीम इंडियाला फायदा झाला, ना शुभमन गिलला. उलट टीमची बॅटिंग ऑर्डर बदलल्यामुळे भारताच्या पाच खेळाडूंचं करिअरच पणाला लागलं आहे.
शुभमन गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर संजू सॅमसनला त्याची ओपनिंगची जागा खाली करावी लागली, यानंतर संजू आशिया कपमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळला, पण खालच्या क्रमांकावर यश येत नसल्यामुळे संजूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधूनच बाहेर केलं गेलं.
advertisement
यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे, पण त्यालाही ओपनरची जागा फिक्स असल्यामुळे भारताच्या टी-20 टीममध्ये संधी मिळत नाहीये. शुभमन गिलच्या ओपनिंगसाठी टीम इंडियाने तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यालाही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवून बघितलं, पण यात त्यांनाही यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अखेर शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. खरंतर शिवम दुबेची टीममधली भूमिका ही फिनिशरची आहे, पण तिसऱ्या क्रमांकाची अडचण दूर करण्यासाठी दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं, पण तोही 22 रन करून आऊट झाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गिलला नेमकं कोण वाचवतंय? T20 मध्ये टेस्ट खेळला 'प्रिन्स', एकट्यासाठी टीम पणाला लावली!


