रोहितला बाहेर बसवलं,पण या खेळाडूसमोर चालली नाही गंभीरची मनमानी; नाकावर टिच्चून दाखवला स्वत:चा वट

Last Updated:

रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे सिनिअर खेळाडू बाहेर झाले असले तरी गौतम गंभीरची डोकेदुखी काय मिटली नाही आहे. कारण टीम इंडियातील एका खेळाडूने गौतम गंभीर समोरच मनमानी सूरू केली आहे.

gautam gambhir team india
gautam gambhir team india
Team India : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि टेस्टमधून निवृत्ती घेताच गौतम गंभीरचं मैदान मोकळं झालं. कारण संघ निवड आणि ड्रेसिंग रूममधील निर्णय घेण्यामध्ये आता गंभीरला कुणाचाच अडसर नव्हता. पण आता रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे सिनिअर खेळाडू बाहेर झाले असले तरी गौतम गंभीरची डोकेदुखी काय मिटली नाही आहे. कारण टीम इंडियातील एका खेळाडूने गौतम गंभीर समोरच मनमानी सूरू केली आहे.त्यामुळे गौतम गंभीरसमोर आता सिनिऑरीटीचा माज दाखवणारा हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रोहित शर्माचा सहकारी जसप्रीत बुमराह आहे.ज्यावेळेस रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्टमधून निवृत्ती घेतली. त्यावेळेस गौतम गंभीरने शुभमन गिलला टेस्टचा नवा कर्णधार बनवले होते.तर जसप्रीत बुमराहला सिनिअर खेळाडू म्हणून संघात स्थान दिले होते.त्यामुळे आता याच सिनिऑरीटीचा आता बुमराह फायदा घेत असल्याचे स्पष्ट होतं आहे.
advertisement
कारण इंग्लंड दौऱ्यादरम्यान वर्कलोड हा शब्द खुप प्रचलित झाला होता. हा शब्द खासकरून जसप्रीत बुमराहसाठी वापरला गेला होता.कारण सगळे खेळाडू इंग्लंडविरूद्ध सगळे सामने खेळणार होते. तर जसप्रीत बुमराह हा फक्त या मालिकेत तीनच सामने खेळणार होता. आणि हे सामने तो कोणते खेळणार होता,याची माहिती फक्त त्यालाच होतीच,त्यामुळे इथूनच जसप्रीत बुमराहच्या मनमानीला सूरूवात झाली होती.
advertisement
दरम्यान इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेनंतर जसप्रीत बुमराह आशिया कप खेळला होता. या आशिया कपमध्ये भारताचे 7 सामने होते. या 7 पैकी 5 सामन्यात बुमराह खेळला.त्यामुळे दोन सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. यानंतर आशिया कप जिंकल्यानंतर तीनच दिवसांनी वेस्ट इंडिज विरूद्ध दोन टेस्ट सामन्यात बुमराह खेळतोय.
advertisement
वेस्ट इंडिज विरूद्ध टेस्ट मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यात भारत तीन वनडे सामने आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी आजच संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये वनडेच्या 14 सदस्यीय संघाच जसप्रीत बुमराहचे नाव नाही आहे. तर टी20 संघात जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे सोईनुसार जसप्रीत बुमराह खेळतोय.त्याला त्याच्या आवडीनुसार स्थान मिळतेय. त्यामुळे गौतम गंभीरसमोर तो एकप्रकारे मनमानीच करतोय. त्यामुळे बुमराह नाकावर टीचून वट दाखवतोय.
advertisement
आम्ही त्याला एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच विश्रांती दिली आहे. जेव्हा आम्ही त्याच्या कामाचे व्यवस्थापन करू शकू तेव्हा आम्ही ते करू. नेहमीच एक योजना असते. तो किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला संघाच्या हिताचा विचारही करावा लागेल. सिराज खूप षटके देखील टाकतो. शेवटी आपल्याला भरपूर गोलंदाजी करावी लागेल. दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी आम्ही सीमरना व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करू, असे अजित आगरकर म्हणाला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका 
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहितला बाहेर बसवलं,पण या खेळाडूसमोर चालली नाही गंभीरची मनमानी; नाकावर टिच्चून दाखवला स्वत:चा वट
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement