IND vs ENG : 'पिच कुठे आहे?', पहिल्या टेस्ट मॅचच्या खेळपट्टीचा Photo समोर, टीम इंडिया टेन्शनमध्ये!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टेस्ट मॅचच्या सीरिजचा पहिला सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टेस्ट मॅचच्या सीरिजचा पहिला सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यादरम्यान हेडिंग्लेच्या खेळपट्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बघून मैदानामध्ये खेळपट्टी नेमकी कुठे आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. हेडिंग्लेच्या या मैदानामध्ये जेवढं गवत आहे, तेवढंच गवत खेळपट्टीवरही दिसत आहे, त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर भारतीय चाहत्यांची प्रतिक्रिया
भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या टेस्टसाठी हिरवीगार खेळपट्टी दिसत आहे, ही खेळपट्टी पाहून टीम इंडियाचे खेळाडू टेन्शनमध्ये येतील, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिल्या आहेत.
खेळपट्टी पाहिल्यानंतर एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले, 'मला इथे कोणतीही खेळपट्टी दिसत नाही." एका चाहत्याने लिहिले, 'खेळपट्टी कुठे आहे?'
Headingley pitch for the first Test Match between india vs England.👀 pic.twitter.com/I5vqlHT8yE
— Saanvi (@SaanviMsdian) June 19, 2025
advertisement
एका चाहत्याने लिहिले, 'ही क्रिकेट खेळपट्टी आहे की हिरवेगार पार्क?' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'या खेळपट्टीवर, आमचे बॅटर जितेंद्र आणि मिथुनसारखे नाचताना दिसतील', तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, 'भारताने एका डावात 100 पेक्षा जास्त रन कराव्यात अशी प्रार्थना करा'.
Please mark, I don't see any pitch here
— Gopinath 🤖 (@gopi_codes) June 18, 2025
advertisement
Where is the pitch?
— Sourabh Sanyal 🇮🇳 (@sourabhsanyal) June 19, 2025
हेडिंग्लेमध्ये टीम इंडियाचं खराब रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानावर सात टेस्ट मॅच खेळवल्या गेल्या आहेत. यात भारतीय टीमने फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, इंग्लंडने चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 1952 मध्ये या मैदानावर खेळला गेला होता, जो इंग्लंडने जिंकला होता. भारतीय टीमने 1986 मध्ये या मैदानावर पहिला विजय मिळवला. भारतीय टीमने इंग्लंडचा 279 रननी पराभव केला. त्यानंतर, 2002 मध्ये भारतीय टीमने दुसऱ्यांदा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय टीमने इंग्लंडचा एक डाव आणि 46 रननी पराभव केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 11:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 'पिच कुठे आहे?', पहिल्या टेस्ट मॅचच्या खेळपट्टीचा Photo समोर, टीम इंडिया टेन्शनमध्ये!