advertisement

Abhishek Sharma : 0,0,0...जर्सी बदलली तरी पुन्हा तोच मुर्खपणा, 'मॅचविनर' ठरला टीम इंडियासाठी डोकेदुखी

Last Updated:

आजच्या सामन्यात त्याने मोहम्मद सिराजची जर्सी घालून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील 3 बॉलमध्ये शून्य धावा करून बाद झाला होता. त्यामुळे जर्सी बदलली तरी नशीब तेच असं काहीसं अभिषेक सोबत घडलं आहे.

abhishek sharma duck wicket
abhishek sharma duck wicket
India vs Netherland : टी20 वर्ल्ड कपच्या 2026 च्या ग्रुप स्टेजमधला भारताचा शेवटचा सामना हा नेदरलँड विरूद्ध सूरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा डकवर बाद झाला आहे.मागच्या तीन सामन्यापासून तो शुन्यावर बाद होत आहे.आजच्या सामन्यात त्याने मोहम्मद सिराजची जर्सी घालून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील 3 बॉलमध्ये शून्य धावा करून बाद झाला होता. त्यामुळे जर्सी बदलली तरी नशीब राहिलं असं काहीसं अभिषेक सोबत घडलं आहे. विशेष म्हणजे टी20 वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक वेळा डक वर आऊट होणारा खेळाडू ठरला आहे.
खरं तर टी20 वर्ल्ड कप आधी अभिषेक शर्माला सर्वात मोठा मॅचविनर आणि धोकादायक खेळाडू म्हणून पाहिले जात होते. पण वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. कारण युएसविरूद्ध पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा डकवर बाद झाला होता.त्यानंतर नामिबिया विरूद्ध सामन्याआधी अभिषेकच पोट बिघडल्यामुळे त्याला सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान विरूद्ध तो पुन्हा मैदानात आला. पण पाकिस्तानविरूद्ध देखील तो शुन्यावर बाद झाला.
advertisement
त्यानंतर आजच्या सामन्यात देखील नामिबिया विरूद्ध तो शुन्यावर बाद झाला आहे. खरं तर आजच्या सामन्यात मैदानात फलंदाजीला उतरण्यापूर्वी त्याने पहिल्यांदा अर्शदिपची जर्सी घातली.पण अर्शदिप प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याने ती काढून मोहम्मद सिराजची काढली.अशाप्रकारे त्याने नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.पण तो पुन्हा शुन्यावर बाद झाला आहे. वर्ल्डकप मध्ये तिसऱ्यांदा असं झालंय की अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला आहे.
advertisement
दरम्यान अभिषेक शर्माने आता भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक (5) वेळा डकवर आऊट झाला आहे. 2024 मध्ये संजू सॅमसन देखील इतक्याच वेळ बाद झाला होता.
टी20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक डक (6) करणारे सलामीवीर
सैम अयुब (पाकिस्तान, 2025)
5 - चालोएमवोंग चटफाईसन (थायलंड, 2024)
5 - कुशल भुर्तेल (नेपाळ, 2024)
advertisement
5 - धर्मा केसुमा (इंडोनेशिया, 2025)
5 - परवेझ हुसेन इमोन (बांगलादेश, 2025)
5 - अभिषेक शर्मा (भारत, 2026)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : 0,0,0...जर्सी बदलली तरी पुन्हा तोच मुर्खपणा, 'मॅचविनर' ठरला टीम इंडियासाठी डोकेदुखी
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement