VIDEO : टीम इंडियाला फुकटात विकेट मिळाली, श्रेयसच्या चमत्कारीक थ्रोने कॅप्टनचा काटा काढला

Last Updated:

टीम इंडियाला एक विकेट फुकटात मिळाली. ही विकेट फक्त आणि फक्त श्रेयस अय्यरमुळे शक्य झाली आहे.त्यामुळे श्रेयसने मैदानात नेमकं काय केलं? हे जाणून घेऊयात.

Shreyas Iyer Run out Michael Bracewell
Shreyas Iyer Run out Michael Bracewell
Shreyas Iyer Run out Michael Bracewell : वडोदराच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 300 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोर 301 धावांचे आव्हान असणार आहे.या सामन्यात टीम इंडियाने खुप चांगली फिल्डिंग केली होती. विशेष म्हणजे या सामन्यात टीम इंडियाला एक विकेट फुकटात मिळाली. ही विकेट फक्त आणि फक्त श्रेयस अय्यरमुळे शक्य झाली आहे.त्यामुळे श्रेयसने मैदानात नेमकं काय केलं? हे जाणून घेऊयात.
खरं तर ही घटना 42 व्या ओव्हर दरम्यान घडली आहे. ही ओव्हर टाकायला हर्षित राणा आला होता. या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर डेरी मिचेल लाँग ऑनच्या दिशेने शॉर्ट खेळला होता.हा बॉल खूपच दूर गेलेला पाहून डेरीने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण बाऊंन्ड्री लाईनवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने वायु वेगाने स्टम्पच्या दिशेने थ्रो करत मिचेल ब्रेसवेलला रनआऊट केले.मिचेल ब्रेसवेल आपल्याच धुंदीत धावत बसला आणि रनआऊट झाला. विशेष म्हणजे ही विकेट टीम इंडियाला मिळेल असे कुणाला वाटलं देखील नव्हते. पण टीम इंडियाला फुकटात विकेट मिळाली.
advertisement
विशेष म्हणजे श्रेयर अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना खंबीर दुखापत झाली होती.या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचा फिटनेसचा प्रश्न होता. मात्र विजय हजारे स्पर्धेत त्याने वादळी खेळी करून आपली फिटनेस सिद्ध केली होती.त्यानंतर आता त्याने हा रनआऊट घेऊन तो किती फिट आहे,याचा दाखला दिला आहे.
advertisement
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोलीसने डावाची चांगली सूरूवात केली होती. दोघांनी मिळून जवळपास 117 धावांची पार्टनरशीप केली होती. त्यानंतर हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेला 56 धावांवर क्लिन बोल्ड केले. तर हेन्री निकोलसला 62 धावांवर कॅच आऊट केले. त्यानंतर डेरी मिचेलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली आहे. या खेळीमुळेच न्यूझीलंड 300 धावांचा टप्पा ओलांडू शकली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट घेतले. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
advertisement
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाचेरी फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
advertisement
भारत विरूद्ध न्यूझीलंड वनडे मालिका वेळापत्रक
पहिला वनडे सामना : 11 जानेवारी 2026, वडोदरा, दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना : 14 जानेवारी 2026, राजकोट,दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना : 18 जानेवारी 2026, इंदुर, दुपारी 1.30 वाजता
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
advertisement
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : टीम इंडियाला फुकटात विकेट मिळाली, श्रेयसच्या चमत्कारीक थ्रोने कॅप्टनचा काटा काढला
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement