IND vs PAK : फायनल सामन्यात सुर्याची मोठी खेळी, हुकमी एक्का मैदानात उतरवला, पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात सुर्यकुमार यादवने मोठी खेळी केली आहे.
India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात सुर्यकुमार यादवने मोठी खेळी केली आहे. सुर्याने फायनलमध्ये त्याचा हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. विशेष म्हणजे त्याने आशिया कपमध्ये एकही सामना खेळलेला नाही आहे. त्यामुळे हा खेळाडू कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाकिस्तान विरूद्ध फायनल सामन्यात सुर्यकुमार यादवने रिंकु सिंहला संधी दिली आहे.रिंकू सिंह हा तोच खेळाडू आहे ज्याला आशिया कप 2025 च्या कोणत्याच सामन्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. पण आज फायनल सामन्यात रिंकुला खेळायची संधी मिळाली आहे.त्यामुळे आता रिंकु सिंह या संधीचं सोनं करतो का? हे पाहावे लागणार आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्येच दुखापत झाली होती. शिवम दुबे आणि रिंकू सिंग याचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंगला बाहेर बसावं लागलं आहे.त्यामुळे हार्दिक पांड्या संघात नसल्याने टीम इंडियाचा धक्का बसला आहे.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : फायनल सामन्यात सुर्याची मोठी खेळी, हुकमी एक्का मैदानात उतरवला, पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ