IND vs PAK : रिंकुने एकीच मारा, लेकिन सॉलिड मारा..., खेळी पाहून आजारी वडील उठून बसले, म्हणाले...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ज्याक्षणी रिंकूने विजयी धाव काढली त्याच क्षणी त्याचे आजारी बाबा उठून बसले. याबाबत स्वत:च रिंकुच्या वडिलांनी मीडियाला माहिती दिली आहे.
Rinku singh Father Reaction on winnig Run : आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने 5 विकेटसने पाकिस्तानला धुळ चारली होती. या सामन्याचा शेवट खूपच ड्रामॅटीक होता,कारण ज्या रिंकु सिंहने आशिया कपमध्ये एकही बॉल खेळला नव्हता, तो खेळाडू शेवटची विजयी धाव काढण्यासाठी मैदानात उतरला होता.आणि रिंकुने विनिंग शॉट मारून भारताला विजय मिळवून दिला होता.त्यामुळे रिंकूच्या एका शॉर्टने पाकिस्तान गार झाली. विशेष म्हणजे ज्याक्षणी रिंकूने विजयी धाव काढली त्याच क्षणी त्याचे आजारी बाबा उठून बसले. याबाबत स्वत:च रिंकुचे वडिल खानचंद सिंह यांनी मीडियाला माहिती दिली आहे.यावेळी घरातलं वातावरण कसं होतं? हे देखील त्यांनी सांगितले आहे.
एएनआयशी बोलताना रिंकूचे वडील खानचंद सिंह यांनी सांगितले, माझी तर तब्येत खूप खराब होती. पण ज्यावेळेस माझ्या पोराने शेवटच्या बॉलवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला, तसा मी एकदम फीट झालो.काल तर माझी तब्येत खूपच खराब होती. पण आज तर एकदम ठणठणीत बरा झालो आहे. कुठलाच आजार नसल्या सारखे वाटतेय, असे रिंकु सिंहचे वडील खानचंद सिंह यांनी सांगितले.
advertisement
#WATCH | Aligarh, UP | On India defeating Pakistan to lift the #AsiaCupFinal trophy, cricketer Rinku Singh's father, Khanchand Singh, says, "Yesterday's match went well. My health was a bit off, but as soon as my son (Rinku Singh) hit the winning boundary, I was completely fine.… pic.twitter.com/Huc0UsDkDE
— ANI (@ANI) September 29, 2025
advertisement
भारताला सामना जिंकून दिल्यानंतर रिंकु सिंहने त्याच्या वडिलांना कॉल देखील केला होता. या कॉलवर बोलताना रिंकु सिंह वडिलांना म्हणाला,पप्पा कसं वाटतंय?खूप चांगल वाटतंय,माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, असे रिंकुचे वडिलांनी त्याला फोनवर सांगितले.
मी मॅच इतके पाहत नाही पण कालचा सामना मी पुर्ण बघितला.दोन कॅच त्याने फार सुंदर घेतल्या.रिंकू सिंहच्या लहानपणीच्या आठवणीबद्दल बोलताना वडील म्हणाले की, लहानपणी घरी खेळताना थोड विचित्र वाटायचं.पण मला आता मला खूप चांगला वाटतंय.त्यामुळे त्याला मी इतकाच आर्शिवाद देईन की त्याने असंच देशाचं नाव मोठं करावं,असे त्यांनी शेवटी म्हटलं.
advertisement
यासोबत रिंकु सिंहने सामन्यानंतर संजय मांजरेकर यांच्याशीही बातचीत केली होती. यावेळी रिंकु म्हणाला, मी या स्पर्धेत फक्त एकच बॉल खेळलो.पण किती बॉल खेळतो याला महत्व नाही, पण टीमसाठी कशी खेळी करता हे महत्वाचे आहे.त्यामुळे शेवटी तेच घडलं 3 बॉलमध्ये 1 धाव हवी असताना चौकार मारला. तसेच सर्वांना माहिती आहे मी फिनिशर आहे.त्यामुळे मला पुन्हा फिनिशरचा रोल करण्याची संधी मिळाली. पण एक बॉल मिळाली त्यात टीम जिंकली हे महत्वाचे आहे,असे रिंकु सांगतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 8:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : रिंकुने एकीच मारा, लेकिन सॉलिड मारा..., खेळी पाहून आजारी वडील उठून बसले, म्हणाले...