Abhishek Bajaj: बिग बॉस 19 अभिषेक बजाजची EX पत्नी; दीड वर्षातच मोडलं लग्न, केले गंभीर आरोप

Last Updated:

Abhishek Bajaj: बिग बॉस 19 मधला चर्चेतला स्पर्धक अभिषेक बजाज घरात त्याच्या रागीट स्वभावामुळे सतत चर्चेत राहतो. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो घराबाहेरही चर्चेत असतो.

बिग बॉस 19 अभिषेक बजाजची EX पत्नी
बिग बॉस 19 अभिषेक बजाजची EX पत्नी
मुंबई : बिग बॉस 19 मधला चर्चेतला स्पर्धक अभिषेक बजाज घरात त्याच्या रागीट स्वभावामुळे सतत चर्चेत राहतो. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो घराबाहेरही चर्चेत असतो. कारण त्याचं लग्न आणि त्यानंतरचा घटस्फोट. अभिषेक बजाजची माजी पत्नी आकांक्षा जिंदाल हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासे केले.
अभिषेक आणि आकांक्षा यांची पहिली भेट शाळेत झाली. ते 9वीत असताना एकमेकांना भेटले आणि दोघं प्रेमात पडले. कॉलेजनंतरही त्यांचं रिलेशनशिप टिकून राहिलं. जवळपास 10 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
लग्नानंतर फक्त दीड वर्षातच या जोडप्यात दुरावा वाढला. आकांक्षाच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर अभिषेकचा स्वभाव बदलला. तो तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करू लागला. आकांक्षाला क्रिएटवर व्हायचं होतं, पण अभिषेकने तिच्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला. मुलाखतीत आकांक्षाने मोठा दावा केला. तिने अभिषेकवर फसवणुकीचे आरोप केले. "तो आधीसारखा राहिला नाही, मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होता," असं तिने स्पष्ट सांगितलं.
advertisement
आकांक्षा जिंदाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती फॅशन, ट्रॅव्हल आणि लाइफस्टाईलशी निगडित फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करते.
2018 नंतर आकांक्षाने अभिषेकसोबतचे फोटो काढून टाकले. मात्र, बिग बॉस 19 मध्ये अभिषेकच्या एंट्रीनंतर त्याच्या लग्नाचे जुने फोटो पुन्हा व्हायरल झाले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhishek Bajaj: बिग बॉस 19 अभिषेक बजाजची EX पत्नी; दीड वर्षातच मोडलं लग्न, केले गंभीर आरोप
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement