नव्या कोऱ्या थार गाडीने चौघांना चिरडले, गाडीवर नंबर प्लेटही नव्हती, धाराशिवची घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dharashiv Accident News: थार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून चार जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव: शहरात सायंकाळी एका मद्यधुंद महिंद्रा थार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून चार जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खाजनगर ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेली थार गाडी नवी कोरी होती आणि त्यावर नंबर प्लेटही नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने आपल्या नव्या महिंद्रा थार गाडीवरील नियंत्रण गमावले आणि रस्त्यावरील चार नागरिकांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तरुणांनी धाडस दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नव्या कोऱ्या थार गाडीने चौघांना चिरडले, गाडीवर नंबर प्लेटही नव्हती, धाराशिवची घटना