IND vs PAK : अर्ध्या मॅचमध्ये टीम इंडिया सेमी फायनलला, 34 व्या ओव्हरमध्ये ड्रामा, पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.या सामना संपण्याआधीच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे, पाकिस्तान सरळ सरळ वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे.
India vs Pakistan : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.या सामना संपण्याआधीच टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे, पाकिस्तान सरळ सरळ वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे.त्यामुळे अर्ध्या सामन्यातच पाकिस्तान बाहेर कशी झाली?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
त्याचं झालं असं की भारताने पाकिस्तानसमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य 50 ओव्हर ऐवजी 33.3 ओव्हरमध्ये गाठायचे होते. पण पाकिस्तान 34 ओव्हरपर्यंत फक्त 167 धावा करू शकल्याने पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. तर भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
भारताने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण सलामीवर समीर मिन्हास 9 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर हमझा जहूर आणि उस्मान खानने पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण हमजा जहूर अर्धशतक ठोकण्याआधीच 42 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर उस्मान खान 66 धावांवर बाद झाला. दोघेही चांगल्या लयीत असलेल्या खेळाडू बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव गडगडला.
advertisement
कर्णधार हरफान योसोफने 38 धावांची खेळी केली.त्यानंतर सगळे खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले आहेत.आणि 46.2 ओव्हरमध्ये पाकिस्तानचा डाव 194 धावांवर ऑल आऊट झाला.त्यामुळे भारताने हा सामना 58 धावांनी जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
भारताकडून आयुश म्हात्रे आणि खिलान पटेलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत.कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा,आर अम्बरीश, आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
भारताचा डाव
टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. टीम इंडियाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ कर्णधार आयुश म्हात्रे शुन्यावर बाद झाला,त्यानंतर लगेचच ऑरोन जॉर्ज 16 वर बाद झाला. भारताच्या या तीनही विकेट 47वर पडल्या होत्या.
advertisement
टीम इंडियाचे हे तीन खेळाडू बाद झाल्यानंतर 18 वर्षांचा वेदांत त्रिवेदी मैदानात आला, यावेळी त्याच्यासोबत विहान मल्होत्रा मैदानात होता. यावेळ वेदांतने संयमीपणे मैदानात टीचून खेळायला सूरूवात केली.या दरम्यान दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट पडतच होत्या. विहान मल्होत्रा 21 तर अभिग्यान कुंडू 16 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर वेदांत त्रिवेदीने एकट्याने पाकिस्तानशी भिडून 68 धावांची खेळी केली. जिकडे सगळेच खळाडू फेल ठरत होते तिकडे वेदांतने अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 200 च्या आसपास पोहोचला होता.
advertisement
त्यानंतर शेवटच्या क्षणी आर अम्बरीशने 29, खिलान पटेलने 21 धावा आणि कनिश्क चौहाने 35 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 252 धावांवर ऑल आऊट झाली होती.पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने प्रत्येकी 3,मोहम्मद सय्यामने 2 आणि अली राजा,अहमद हुसने, मोमीन कमार आणि अली हसन बलोचने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 8:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : अर्ध्या मॅचमध्ये टीम इंडिया सेमी फायनलला, 34 व्या ओव्हरमध्ये ड्रामा, पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर










