Jitesh Sharma : भर मैदानात जितेश शर्मा तिच्या पाया पडला! कोण आहे महिला क्रिकेटपटू? Video

Last Updated:

टीम इंडियाचा विकेट कीपर जितेश शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यावेळी भारतीय महिला क्रिकेटपटूच्या पाया पडला.

भर मैदानात जितेश शर्मा तिच्या पाया पडला! कोण आहे महिला क्रिकेटपटू?
भर मैदानात जितेश शर्मा तिच्या पाया पडला! कोण आहे महिला क्रिकेटपटू?
मुल्लानपूर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मुल्लानपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. पहिले बॉलरनी बऱ्याच रन दिल्या, त्यानंतर बॅटिंगमध्ये टीम इंडियाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आणली आहे. या सामन्याआधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात जितेश शर्मा भारतीय महिला क्रिकेट टीमच्या खेळाडूच्या पाया पडताना दिसत आहे.

जितेश शर्मा कुणाच्या पाया पडला?

दुसऱ्या टी-20 सामन्याआधी जितेश शर्मा एका महिला क्रिकेटपटूच्या पाया पडला. मुल्लानपूरमध्ये मॅच सुरू व्हायच्या आधी ही घटना घडली. मॅच आधी जितेश शर्मा वॉर्मअप करत होता, तेव्हा जितेश महिला क्रिकेटपटूच्या जवळ गेला. जितेश शर्मा त्याच्या ट्रेनिंग किटमध्ये होता आणि त्याच्या हातात बॅट आणि बॅटिंग ग्लोव्हज होते. तरीही जितेशने महिला क्रिकेटपटूचे पाय धरले, यानंतर तिने जितेशची पाठ थोपटली. ही महिला क्रिकेटपटू हरलीन देओल होती. हरलीन आणि जितेश यांच्यात काही वेळ चर्चाही झाली.
advertisement
हरलीन देओल महिला वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या भारतीय टीमची सदस्य होती. हरलीनने 5 सामन्यांमध्ये 33.80 च्या सरासरीने 169 रन केले.



 










View this post on Instagram























 

A post shared by Sandeep Singh (@sportstalkcricket_)



advertisement

भारताला पराभवाचा धक्का

दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 213/4 एवढा स्कोअर केला. क्विंटन डिकॉकने फक्त 46 बॉलमध्ये 90 रनची खेळी केली. भारताकडून वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 29 रन देऊन 2 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये भारताच्या 3 विकेट गेल्या, यानंतर तिलक वर्मा एकटा किल्ला लढवत होता, पण त्याला कुणाचीच साथ मिळाली नाही. तिलकने 34 बॉलमध्ये 62 रन केले, ज्यात 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. टीम इंडियाचा या सामन्यात 19.1 ओव्हरमध्ये 162 रनवर ऑलआऊट झाला. जितेश शर्माने 17 बॉलमध्ये 158.82 च्या सरासरीने 27 रन केले, यात त्याने 2 फोर आणि 2 सिक्स मारले.
advertisement

कधी होणार तिसरा सामना?

या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 101 रननी विजय झाला होता. सीरिजचा तिसरा सामना रविवार 14 डिसेंबरला धर्मशालामध्ये होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jitesh Sharma : भर मैदानात जितेश शर्मा तिच्या पाया पडला! कोण आहे महिला क्रिकेटपटू? Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement