IND vs SA : दोन दिवसापासून विकेट पडतच नव्हती, अखेर जड्डूने 24 बॉलमध्ये प्लॅन ओवला अन् 4:30 तासांची झुंज अखेर यशस्वी
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravindra Jadeja Get Wicket of Kyle Verreynne : रविंद्र जडेजाने एका एन्डवरून आपल्या फिरकीचा मारा चालू ठेवला. दुसरीकडे बुमराह आणि कुलदीप फेल होत असताना जडेजाने विकेटभोवती जाळं तयार केलं.
India vs South Africa 2nd Test : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्यात अखेर टीम इंडियाला रविंद्र जडेजाने आशेचा किरण दाखवला आहे. आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नव्हती. तर पहिल्या दिवसाच्या अखेरीस देखील भारतीय संघाला विकेट मिळत नव्हत्या. अशातच आता जडेजाने अशक्य असं काम करून दाखवलंय.
जेव्हा बॅटर फसतोय असं लक्षात येताच...
रविंद्र जडेजाने एका एन्डवरून आपल्या फिरकीचा मारा चालू ठेवला. दुसरीकडे बुमराह आणि कुलदीप फेल होत असताना जडेजाने विकेटभोवती जाळं तयार केलं. जड्डूने ऑफ स्टंपवर बॉल टाकण्यास सुरूवात केली अन् जेव्हा बॅटर फसतोय असं लक्षात येताच जड्डूने विकेट केटिंग बॉल फेकला. त्यानंतर रवींद्र जडेजाने डावाच्या 121 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर काइल व्हेरेनला आऊट केलं. स्टंपच्या मागे ऋषभने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
Experience pays off!
Clever move from #RavindraJadeja, fires the ball wide as he saw Verreynne stepping out. #INDvSA 2nd Test, Day 2 LIVE NOW https://t.co/J8u4bmcZud pic.twitter.com/zlAfYkyv5b
— Star Sports (@StarSportsIndia) November 23, 2025
advertisement
88 धावांची भागीदारी संपुष्टात
दरम्यान, अशाप्रकारे जडेजाने 88 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. बऱ्याच काळानंतर, आज सकाळपासून वाट पाहत असलेला संघाला विकेट मिळाला. काइल 45 धावा करून बाद झाला. 121 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअ 7 बाद 335 होता. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला विकेट मिळाल्या नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : दोन दिवसापासून विकेट पडतच नव्हती, अखेर जड्डूने 24 बॉलमध्ये प्लॅन ओवला अन् 4:30 तासांची झुंज अखेर यशस्वी


