IND vs SA : गंभीरचं प्लेन लँड होण्याआधीच मोठा झटका,टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनने माती खाल्ली, कोलकत्तात काय होणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुसऱ्या अनधिकृत टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा 5 विकेटसने पराभव केला आहे.त्यामुळे ही सराव मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली आहे. या निकालाने टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
India vs South Africa Test : दुसऱ्या अनधिकृत टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा 5 विकेटसने पराभव केला आहे.त्यामुळे ही सराव मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली आहे. या निकालाने टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण साऊथ आफ्रिकेविरूद्ध निवड समितीने जी प्लेइंग इलेव्हन निवडली होती.त्यामधील टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरताना दिसला आहे. त्यामुळे आता कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खरं तर सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी साऊथ आफ्रिकेसमोर 417 धावांचे लक्ष्य होते, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी साऊथ आफ्रिकेला ऑल आऊट करणे गरजेचे होते. पण शेवटच्या दिवशी साऊथ आफ्रिकने तगडी फाईट देत भारताचा 5 विकेटने पराभव केला आहे. भारताने दिलेल्या या 417 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉर्डन हरमनने 91 धावा, लेसेगो सेनोकवाने 77,झुबेर हमजाने 77 धावांची खेळी केली होती.या खेळाडूंसोबत टेम्बा बावुमाने 59 आणि कॉनोर ईस्टरहुजेनने 52 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने 417 धावांचा भलं मोठं लक्ष्य गाठलं आणि सामना जिंकला.
advertisement
तत्पु्वी भारताने 382 वर 7 विकेट असा दुसरा डाव घोषित केला होता.यावेळी पहिल्या डावातून मिळालेल्या 34 धावांच्या बळावर भारताने 417 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. भारताकडून दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने नाबाद 127 धावांची शतकीय खेळी केली होती. त्याच्यासोबत पंतने 65 आणि हर्ष दुबेने 84 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या धावांच्या बळावर भारताने 7 विकेट 382 वर डाव घोषित केला होता.
advertisement
तर याआधी आफ्रिकेचा पहिला डाव 221 वर ऑलआऊट झाला होता. आफ्रिकेकडून कर्णधार एमजे अकरमनने 134 धावांची सर्वाधिक खेळी होती. तर भारताकडून पहिल्या डावात ध्रुव ज्युरेलने 132 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळीच्या बळावर भारत पहिल्या डावात 255 वर ऑल आऊट झाला होता.
हा सामना पाहता भारताचा टॉप ऑर्डर या सामन्यात अपयशी ठरला होता.विशेष म्हणजे भारताच्या टॉप ऑर्डरमधील हेच खेळाडू साऊथ आफ्रिके विरूद्ध खेळणार आहेत.त्यामुळे मालिकेआधीच हे खेळाडू अपयशी ठरले आहेत.त्यामुळे गंभीरला कोलकत्तात पाऊल ठेवण्याआधी मोठा झटका बसला आहे.
advertisement
साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याचे वेळापत्रक
टेस्ट मालिका
पहिला टेस्ट : भारत आणि साऊथ आफ्रिका, 14 नोव्हेंबर 2025 (कोलकत्ता ईडन गार्डन )
दुसरा टेस्ट : भारत आणि साऊथ आफ्रिका, 22 नोव्हेंबर 2025 (बारसपारा स्टेडिअम)
advertisement
वनडे मालिका
पहिला वनडे : 30 नोव्हेंबर 2025 रांची जेएससीएच्या मैदानावर
दुसरा वनडे : 3 डिसेंबर 2025 , रायपूर शहीद वीर नारायण स्टेडिअम
तिसरा वनडे : 6 डिसेंबर 2025 विशाखापट्टणन एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडिअम
advertisement
टी20 सामन्याचे वेळापत्रक
पहिला टी20 : 9 डिसेंबर 2025, कटक बाराबती स्टेडियम
दुसरा टी20 : 11 डिसेंबर 2025, महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियम,मुल्लानपूर
तिसरा टी20 : 14 डिसेंबर 2025, एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
advertisement
चौथा टी20 : 17 डिसेंबर 2025, एकाना स्टेडियम, लखनऊ
पाचवा टी20 : 19 डिसेंबर 2025, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
भारताचा कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उप कर्णधार/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार, मोहम्मद सिराज. कुलदीप यादव, आकाशदिप
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरचं प्लेन लँड होण्याआधीच मोठा झटका,टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनने माती खाल्ली, कोलकत्तात काय होणार?


