Ravindra jadeja : 'मला न विचारताच बीसीसीआयने...', ऋषभ पंतची व्हाईस कॅप्टन्सी गेल्यावर काय म्हणाला जड्डू?

Last Updated:

Ravindra Jadeja On Vice Captaincy : रविंद्र जडेजाला व्हाईस कॅप्टन केल्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. टीममध्ये आपल्या नावापुढे ‘VC’ (उपकर्णधार) लिहिलेलं पाहून त्यालाही मोठं आश्चर्य वाटलं.

Ravindra Jadeja On Vice Captaincy
Ravindra Jadeja On Vice Captaincy
Ravindra Jadeja Statement : आशिया कप नावावर केल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 मॅचच्या टेस्ट क्रिकेट मालिकेतील पहिली मॅच अहमदाबादमध्ये खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने चांगली मूठ आखडली असून वेस्ट इंडिजला मोठा स्कोर उभारण्याची गरज आहे. अशातच ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) च्या नव्या निवड समितीने फिरकी-बॉलिंग ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला शुभमन गिलचा उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यानंतर जडेजाने मोठं वक्तव्य केलं आहे.

कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती

रविंद्र जडेजाला व्हाईस कॅप्टन केल्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. टीममध्ये आपल्या नावापुढे ‘VC’ (उपकर्णधार) लिहिलेलं पाहून त्यालाही मोठं आश्चर्य वाटलं, असं जड्डूने सांगितलंय. बीसीसीआयने मला सन्मान दिला. कर्णधार, कोच आणि मॅनेजमेंटने मला ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. टीमला कोणत्याही योजनेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी माझी जेव्हाही गरज असते, तेव्हा योगदान देण्यासाठी मी नेहमीच आनंदी असतो, असं जड्डू म्हणाला.
advertisement

नावापुढे VC लिहिलेलं पाहिलं अन्...

बीसीसीआयने किंवा शुभमन गिलने मला काही सांगितलं नाही. जेव्हा टीमची घोषणा झाली तेव्हा मी माझ्या नावापुढे VC लिहिलेलं पाहिलं. दिवसाच्या शेवटी, तुमच्याकडे जो काही अनुभव असतो, तो तुम्ही टीमसाठी शेअर करता, असं म्हणत त्याने व्हाईस कॅप्टन्सची महत्त्व अधोरेखित केलं.

आत्मविश्वास कायम ठेवेन

advertisement
दरम्यान, एक खेळाडू म्हणून, मला आत्मविश्वास मिळतो. तुम्ही जेव्हाही इंग्लंडमध्ये कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला तो आत्मविश्वास मिळतो. आशा आहे की, मी या मालिकेतही तो आत्मविश्वास कायम ठेवेन, काही रन करेन आणि काही विकेट्स घेईन, असंही रविंद्र जडेजा म्हणाला आहे.

85 टेस्ट मॅचचा अनुभवी जडेजा

दरम्यान, 85 टेस्ट मॅचचा अनुभवी जडेजा टीमच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. उपकर्णधार असो वा नसो, खेळाच्या प्रत्येक परिस्थितीत त्याचं इनपुट टीमसाठी उपयुक्त ठरतं. इंग्लंड दौऱ्यानंतर जडेजाचं टीममधलं महत्त्व अधिक वाढलं आहे. अशातच आता जडेजाला उतरत्या काळात नावलौखिक मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra jadeja : 'मला न विचारताच बीसीसीआयने...', ऋषभ पंतची व्हाईस कॅप्टन्सी गेल्यावर काय म्हणाला जड्डू?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement