बेन स्टोक्स हातापाया पडू लागला पण, जडेजाने केला इंग्लंडकडून 'लगान' वसूल, अखेरच्या 20 मिनिटात काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India England Test Draw Handshake Controversy : पाचव्या दिवसाच्या अखेरीस झुंजार खेळी करत दीड तास जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी विकेट टाकली नाही. अखेर दीड तासानंतर बेन स्टोक्सने हत्यार टाकलं.
India reject englands Offer of hand shake : एखादा संघ चौथ्या दिवशी कसोटी सामना जिंकण्याच्या स्थितीत असेल आणि पाचव्या दिवशी हाच संघ सामना संपवण्यासाठी हातापाया पडत असेल तर क्रिकेटमधील ही सर्वात मोठी हतबलता म्हणता येते. हेच टीम इंडियाने करून दाखवलं. मँचेस्टर टेस्टमध्ये शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी चौथा दिवस टिकून खेळ केला आणि पाचव्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा या दोन ऑलराऊंडर खेळाडूंनी ज्या पद्धतीने त्याचं कौतूक करावं तेवढं कमी... दोन्ही खेळाडूंनी इंग्लंडच्या तोंडचं पाणी पळवलं आणि सामना संपवण्याची विनवणी करू लागले. नेमकं काय काय झालं? पाहा
अखेर बेन स्टोक्सने हत्यार टाकलं
पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सेशनमध्ये इंग्लंडला सहा विकेट्स घेण्याची गरज होती. अखेरच्या दोन तासात टीम इंडियाला फक्त विकेट टिकवण्याची गरज होती. दोन तासापैकी दीड तास जरी टीम इंडिया मैदानात पाय रोवून थांबली तरी देखील मॅच ड्रॉ झाली असली. झुंजार खेळी करत दीड तास जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी विकेट टाकली नाही. अखेर दीड तासानंतर बेन स्टोक्सने हत्यार टाकलं. त्यावेळी हॅडशेक करण्यासाठी बेन स्टोक्स समोर आला पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामना कॉल ऑफ करायला नकार दिला. ड्रेसिंग रुममधून तसे आदेश आले होते.
advertisement
इंग्लंडची ऑफर पण जडेजाचा स्पष्ट नकार
खरं तर जडेजा आणि वॉशिंग्टन शतकाच्या जवळ होते. जडेजा 90 तर वॉशिंग्टन सुंदर 82 धावांवर खेळत होता. त्यावेळी शतक पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाने दीड दिवस फिल्डिंग करणाऱ्या इंग्लंडला झुंजवलं. बेन स्टोक्स यावेळी संपाल्याचं पहायला मिळाला. त्याने जडेजाजवळ जात विनंती केली पण जडेजाने स्पष्ट नकार देत इंग्लंडला बॉलिंग करायला भाग पाडलं. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अंदाजात शतक साजरं केलं.
advertisement
The game was done, but the drama wasn’t #SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/zErsvC4XkA
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 27, 2025
गौतम गंभीर म्हणतो...
advertisement
इंग्लंड संघाच्या नाराजीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'जर तुमचा एक खेळाडू 90 धावांवर असेल आणि दुसरा 85 धावांवर असेल, तर ते शतकाच्या पात्रतेचे नाहीत का? जर इंग्लंडचा एखादा खेळाडू 90 धावांवर असेल आणि त्याच्या पहिल्या शतकाच्या इतक्या जवळ असेल, तर त्याला त्याचे शतक पूर्ण करण्याची संधी दिली जाऊ नये का? ते ते कसे घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे', असं गौतम गंभीर म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बेन स्टोक्स हातापाया पडू लागला पण, जडेजाने केला इंग्लंडकडून 'लगान' वसूल, अखेरच्या 20 मिनिटात काय घडलं?