IND vs WI Test : मुंबईकर खेळाडूंवर गौतम गंभीरचा राग का? Sarfaraz Khan सह चार खेळाडूंना स्कॉडमधून डच्चू!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs West Indies Test Series : तब्बल 20 किलो वजन कमी केल्यानंतर देखील वेस्ट इंडिजविरुद्ध सरफराज खान याला संधी देण्यात आली नाही. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली सरफराज अखेरची टेस्ट मॅच खेळला होता.
Sarfaraz Khan dropped For WI Test Squad : आशिया कपनंतर लगेचच टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेसाठी टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला असून 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून अनुभवी रविंद्र जडेजा याला व्हाईस कॅप्टन्सी देण्यात आली आहे. तसेच देवदत्त पडिक्कल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक केलं आहे. मात्र, गंभीरने मुंबईकर खेळाडूंना संधी दिली नाही.
सरफराज खानला डच्चू
तब्बल 20 किलो वजन कमी केल्यानंतर देखील वेस्ट इंडिजविरुद्ध सरफराज खान याला संधी देण्यात आली नाही. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली सरफराज अखेरची टेस्ट मॅच खेळला होता. त्यानंतर देखील गंभीरने सरफराजच्या नावाचा विचार केला नाही. वजन कमी केलं अजून काय पाहिजे? असा सवाल फॅन्स विचारत आहेत. तर दुसरीकडे शार्दुल ठाकूर याला देखील संधी मिळाली नाही.
advertisement
शार्दुल ठाकूरला नो एन्ट्री
शार्दुल ठाकूर याला देखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे गंभीरचा मुंबईकर खेळाडूंवर गंभीरचा राग का? असा सवाल विचारला जात आहे. एकीकडे श्रेयस अय्यर देखील वेस्ट इंडिज संघाचा भाग असणार नाही. सहा महिन्यासाठी तो कसोटी क्रिकेट खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा संघ - शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (व्हाईस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI Test : मुंबईकर खेळाडूंवर गौतम गंभीरचा राग का? Sarfaraz Khan सह चार खेळाडूंना स्कॉडमधून डच्चू!